20200922 160042
ताज्या पनवेल सामाजिक

टॉवरवाडी येथील आदिवासी कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप

टॉवरवाडी येथील आदिवासी कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल तालुक्यातील टॉवरवाडी येथील आदिवासी व गरजू कुटुंबांना रोटरी क्लब ऑफ पनवेल च्या वतीने घरगुती वापरासाठी वस्तूंची मदत करण्यात आली.

यामध्ये कुटुंबातील महिलांच्या आरोग्याला चुलीच्या धुरामुळे धोका असल्यामुळे बायो स्टॉव देण्यात आला. कोरोणा पासून संरक्षणासाठी मास्क, सॅनिटरी नॅपकिन, ताडपत्री आदी वस्तूंचे रो.राजेंद्र मोरे (सर्विस प्रोजेक्ट डायरेक्टर ) यांच्यातर्फे वाटप करण्यात आले. येथील पन्नास कुटुंबाला याचा फायदा मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

29 − 27 =