Img 20201012 Wa0010
कर्जत ताज्या रायगड सामाजिक

आदिवासी युवक – युवती बेरोजगारांसाठी पशुसंवर्धन व्यवसायाचे प्रशिक्षण

आदिवासी युवक – युवती बेरोजगारांसाठी पशुसंवर्धन व्यवसायाचे प्रशिक्षण

कर्जत/ मोतीराम पादिर :
कर्जत तालुक्यात बहूसंख्याने आदिवासी समाज राहात असून तरूण वर्गाचा मोठा समावेश आहे. आदिवासी समाजातील तरुण पिढीने हि शिक्षण घेऊन सुदधा नोकरी, उद्योगधंदा बेरोजगार मिळत नाही. त्यामुळे आदिवासी तरूण वर्ग घरीच बसून आहे. या तरुणाची परिस्थिती बघून कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ हे या तरुणाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी तयार झाली आहे. मंडळाच्या वतीने पाथरज मोरेवाडी या ठीकाणी सभा आयोजीत केली. या सभेमध्ये कर्जत तालुक्यातील युवक व युवती बहुसंख्येने उपस्थिति होते.
आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळाचे आध्यक्ष मनोहार पादिर यांनी प्रशिक्षणाची वेळ, वार व दिनांक ठरवून दिल्याप्रमाणे प्रशिक्षण देण्यात आले. बुधवार दिनांक १४/१०/२०२० रोजी साकाळी १० .०० वाजता शेळीपालन प्रशिक्षण असेल . गुरुवार दिनांक १५/१०/२०२० रोजी सकाळी १० .०० वाजता कुकुटपालन प्रशिक्षण असेल. शुक्रवार दिनांक १६/१०/२०२० रोजी सकाळी १०.०० वाजता दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण असेल. या प्रकारे युवक व युवतीनी प्रशिक्षणासाठी वेळेवर उपस्थित राहण्यास सांगितले. हे प्रशिक्षण् देण्यासाठी तज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे असे चाहू सराई तालुखा आध्याक्ष यांनी सांगितले. हे प्रशिक्षण तीन दिवस चालू राहील आसे सांगण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित अध्यक्ष मनोहार पादिर , तालुकाध्यक्ष चाहू सराई, प्रकाश बांगारे, गणेश पादिर, पुंडलीक उघडा, आदिवासी ठाकूर समास सेवा मंडळ सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.