Img 20201021 Wa0037
कर्जत ताज्या रायगड सामाजिक

मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोले दापत्यांकडून विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप

मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोले दापत्यांकडून विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप

कर्जत/ निलम ढोले :
कोरोना महामारीच्या काळात जरी शाळा बंद असल्या तरी शाळेतील विदयार्थ्यांना ऑफलाईन पध्दतीने सर्वच शाळेत शिक्षण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने शाळा बंद, शिक्षण सुरू हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमा अंतर्गत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरेवाडी येथे विदयार्थ्यांचे ऑफलाईन पद्धतीने उत्तम शिक्षण सुरू आहे. मात्र विदयार्थ्यांना अधिक सराव करता यावा यासाठी स्वाध्याय पुस्तिकांची गरज असल्याचे लक्षात येताच शाळेचे उपशिक्षक श्री.वसंत ढोले व त्यांच्या पत्नी सौ. निलम ढोले यांनी दरवर्षी प्रमाणे आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्याना स्वाध्याय पुस्तिका आणि शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय घेऊन रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरेवाडी येथील इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या एकूण एकोणतीस विदयार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका, शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप केले. ढोले दापंत्य दरवर्षी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटत आहे.
या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. मेंगाळ, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.भारती तुपे, उपशिक्षक वसंत ढोले व त्यांच्या पत्नी सौ. निलम ढोले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नागो पारधी, श्री.राम चौधरी,श्री.अरूण पारधी,सौ.करुणा मेंगाळ,सौ.जागृती मेंगाळ, सौ.मंजुळा शेंडे, सौ.दिपीका पारधी, सौ.दर्शना मेंगाळ, सौ.पुष्पा आवाटे, श्री.मनोज मेंगाळ आदि उपस्थित होते.