20190910 183624
ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड

पनवेलचे उपजिल्हा रुग्णालयाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार

  • पनवेलचे उपजिल्हा रुग्णालयाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार
  • आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आणखी एक वचनपूर्ती 

रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी, तसेच वाढत्या रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पनवेल येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय व २० खाटांचे ट्रॉमा केअर युनिट पूर्णत्वास आले. रुग्णालयाच्या उभारणीपासून ते पूर्ण होईपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. विशेषत्त्वाने प्रशासकीय मान्यता, खर्चास मंजुरी, कामाची पाहणी व त्याचा आढावा घेण्याबरोबरच विधिमंडळातही या संदर्भात आवाज बुलंद केला. बुधवारी लोकार्पित होणाऱ्या पनवेल उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर त्यातील एक महत्वपूर्ण भाग आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आणखी एक वचनपूर्ती  होणार आहे.

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेलचे उपजिल्हा रुग्णालय बुधवार पासून (दि.११) सेवेदाखल होणार आहे. या रुग्णालयाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, बंदरे, वैद्यकीय शिक्षण माहिती तंत्रज्ञान, आणि रायगड व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे,  रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, निरंजन डावखरे, मनोहर भोईर, भरत गोगावले,  सुरेश लाड, जयंत पाटील, अनिकेत तटकरे, बाळाराम पाटील, धैर्यशील पाटील, सुभाष पाटील, अवधूत तटकरे, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती तर सन्माननीय उपस्थिती म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव, जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 2 = 7