बोगस आदिवासींना रोखण्यासाठी सुधागड पाली येथे आदिवासी ठाकूर -ठाकर समाज नोकरवर्ग उत्कर्ष संस्थेची सभा संपन्न
बोगसांविरोधात लढण्यासाठी अकोले तालुक्यातील नोकरदार वर्गाकडून संस्थेला ३०,००० रूपयांची मद्दत
पाली- सुधागड/ प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य आदिवासी ठाकूर- ठाकर नोकरवर्ग संस्थेची महाराष्ट्रातील काही जिल्हयातील ठाकूर-ठाकर नोकरवर्गाची मिटींग (दि. २४ जाने.) रविवार रोजी रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली येथील आदिवास समाज भवन येथे सभा संपन्न झाली.
बोगस आदिवासींना रोखण्यासाठी नोकरदार वर्ग या संस्थेनी महाराष्ट्रातील आठ ही जात पडताळणी कार्यालयाला वारंवार भेटी देत असतात. एवढंच नाही तर संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना वेगवेगळ्या जबाबदारी दिलेल्या आहेत. जात पडताळणी समितींना बोगस आदिवासी विरुद्ध पत्रव्यवहार करणे, बोगसांविरुद्ध रेकॉर्ड काढून ठेवणे, पुराव्यांच्या प्रिंट काढून जवळ ठेवणे, बोगस लोकांनी खोटे पुरावे सादर केले आहेत ते जमविणे, सर्व्हे करणे, टायपिंगचे काम करणे, माहितीचा अधिकार अर्ज करणे, अशा विविध कामांची विभागणी करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर नोकरदार वर्गाच्या कमिट्या तयार करण्यात आल्या आहेत.
बोगस खूसखोरी रोखण्यासाठी प्रत्येकांनी जनजागृती करून आपल्या निर्देशनास आलेल्या बोगसांची आपल्या स्तरावरून माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेऊन संबधित महाराष्ट्र राज्य ठाकूर-ठाकर नोकरवर्ग पदाधिकाऱ्यांना कळविण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अरूण खाकर यांनी केले. तसेच ठाणे, अमरावती, नंदूरबार, नागपुर येथील जात पडताळणी समिती मधील २५ बोगस घुसखोरांना हेरिंग च्या वेळी पुरावे अभावी जात पडताळणी मिळण्यापासून रोखण्यात महाराष्ट्र राज्य ठाकूर-ठाकर नोकरवर्ग संस्थेला यश देखील आले असल्याचे अरूण खाकर यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य आदिवासी ठाकूर -ठाकर नोकरवर्ग उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष अरूण खाकर, उपाध्यक्ष शिवाजी मेंगाळ, उपाध्यक्ष विठ्ठल उघडे, सचिव कांताराम खंडवी, खजिनदार गणेश पारधी, सहसचिव उत्तम डोके, सहखजिनदार गंगाराम बांगारा, नवनाथ उघडे, प्रकाश उघडे, यशवंत हंबीर, नवसु रेरा, कृष्णा पिंगळा, जोमा दरवडा, वाय.के. वारगुडे, जोमा निरगुडे, चंद्रभान मेंगाळ, जय पथवे, भला, पिंगळे, दत्तात्रेय हिंदोळे सह विविध जिल्हयातील आदिवासी ठाकूर-ठाकर नोकरवर्ग उपस्थित होते.