नेरळ माथेरान मार्गावर स्कोडा रैपिड गाडीने घेतला पेट
नेरळ/ नितीन पारधी :
कर्जतहुन नेरळ येथे येत असलेल्या स्कोडा रैपिड गाडीने कर्जत कल्याण या राज्यमार्गावर नेरळ माणगाव येथे पेट घेतल्याची घटना काल सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या वाहनाचा नंबर MH 46 N 5806 या क्रमांकाची स्कोडा रैपिड कार आहे.
परंतु या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी कर्जत येथील अग्निशामक वाहन पोहचले आहे. परंतु गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. गाडीच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.