Img 20210318 Wa0029
कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दीर्घायुष्यासाठी हजरत ख्वाॅजा पीर करमअली शाह दर्ग्यावर ७० फुटांची फुलचादर अर्पण

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दीर्घायुष्यासाठी हजरत ख्वाॅजा पीर करमअली शाह दर्ग्यावर ७० फुटांची फुलचादर अर्पण

पनवेल / प्रतिनिधी
राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरातील हजरत ख्वाॅजा पीर करमअली शाह चिश्ती रहमतुल्ला आलैह बाबांच्या दर्ग्यात 70 फुट फुलांची चादर अर्पण करण्यात आली. तसेच नवसाला पावणारा म्हणूनच प्रसिद्ध असणाऱ्या आणि सर्व जातीधर्मातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या दर्ग्यात रामशेठ यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रतिष्ठानचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्यासह उपस्थितांनी दुवाही मागितली.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० वा वाढदिवसानिमित्त तालुक्यात निरनिराळे उपक्रम राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी 70 उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच उपक्रमांतर्गत आज 18 मार्च रोजी येथील प्रसिद्ध श्रद्धास्थान असलेल्या हजरत ख्वाॅजा पीर करमअली शाह चिश्ती रहमतुल्ला आलैह बाबांच्या दर्ग्यात 70 फुट फुलांची चादर अर्पण करण्यात आली.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांना या अशा अनोख्या शुभेच्छा देताना केवल महाडिक आणि त्यांच्यासेबत असणाऱ्या “कोकण डायरी”चे संपादक तसेच भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नवी मुंबई प्रभारी सय्यद अकबर, आदिवासी सम्राटचे संपादक गणपत वारगडा, सदाशिव मोरे, ओमकार महाडिक, रहिस शेख यांच्यासह दर्ग्यातील मान्यवरांनीही यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे यासाठी बाबांकडे दुवाही मागितली.