IMG-20210315-WA0062
कोकण ताज्या रायगड सामाजिक

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा व कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांच्या शुभहस्ते आपला आधार फाउंडेशनच्या व्यावसायिक कार्यालयाचे थाटामाटात उदघाटन

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा व कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांच्या शुभहस्ते आपला आधार फाउंडेशनच्या व्यावसायिक कार्यालयाचे थाटामाटात उदघाटन

पनवेल / प्रतिनिधी :
पनवेल मधील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आपला आधार फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब तसेच कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
आपला आधार फाउंडेशनमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्रामार्फत तसेच सी.एम.जी.पी , तसेच पी, एम, जी, पी, स्टार्टअप इंडिया, कौशल्य भारत, खादी इंडिया या सरकारी निम सरकारी योजनेतून आपला स्वतंत्र व्यवसाय स्थापन करण्याकरिता तसेच बेरोजगारांना उदमी होण्याकरिता कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून खास तरुण – तरुणी आणि महिलांसाठी रोजगाराची संधी मुंबई , महाराष्ट्र इतर राज्य करिता देखील उपलब्ध आहे. तसेच याव्यतिरिक्त रिअल इस्टेट, होम लोन, पर्सनल लोन, बिझनेस लोन व इतर लोन देखील उपलब्ध करून देण्याचे काम देखील याठिकाणी केले जाणार आहे.
या उदघाटन सोहळ्यास राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, सचिन लोखंडे, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, खांदा कॉलनी अध्यक्ष मच्छीन्द्र पाटील, उपाध्यक्ष सदाशिव मोरे, गंगाराम शिंदे, ओमकार महाडिक, विजय शिंदे कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पडला यावेळी उपस्थित पाहुण्यांनी कार्यालयास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपला आधार फाउंडेशनचे व्यवस्थापक सदाशिव मोरे यांनी आभार व्यक्त करून कामाची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 5 = 3