20210527_132504
ताज्या नवी मुंबई पनवेल

लग्नाचे अमिष दाखवून शारीरीक संबंध ठेवणार्‍या तरुणास अटक

लग्नाचे अमिष दाखवून शारीरीक संबंध ठेवणार्‍या तरुणास अटक

पनवेल/प्रतिनिधी :
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दितील मुस्लिम तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवून नंतर तिला लग्नास नकार देवून दुसर्‍या तरुणीबरोबर विवाह जमवून साखरपुडा करण्याचा घाट लक्षात आल्याने त्या तरुणीने फसवणूक करणार्‍या तरुणाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पनवेल शहर पोलिसांनी तक्रार करणार्‍या तरुणीने दिलेल्या माहितीवरुन जुनेद गफूर काझी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 2007 रोजी ही तरुणी आपल्या कुटूंबासह पनवेल येथे रहावयास आली होती. यावेळी तिची ओळख जुनेद गफूर काजी या 28 वर्षीय तरुणाशी झाली. त्यांची चांगली मैत्री जमली. त्यानंतर जुनेद काजी याने या तरुणी समोर प्रेमाचा प्रस्ताव मांडला. त्याचा प्रस्ताव मान्य करताना सदर तरुणीने लग्न करण्याचे त्याच्याकडून कबूल करुन घेतले. त्यानंतर मग दोघे वारंवार भेटू लागले. तिचा विश्‍वास संपादन केल्यानंतर जुनेद काझी हा तिला लॉजवर घेवून गेला व ती नको म्हणत असताना तिच्याबरोबर शारिरीक संबंध प्रस्तापित केले. यानंतर मग अनेक वेळा हा प्रकार घडला. 2009 मध्ये तरुणीच्या घरच्यांची तिचा साखरपुडा मुंब्रा येथील तरुणाबरोबर केला. त्यावेळी जुनेद काझी वारंवार हा साखरपुडा तोडण्यासाठी सांगत होता. तरुणीलाही जुनेदबरोबर लग्न करावयाचे असल्याने तिने आपल्या आईवडीलांना सांगून हा साखरपुडा मोडला. त्यानंतर पुन्हा तो या तरुणीला लॉजवर घेवून जावून शारिरीक संबंध ठेवू लागला. मात्र लग्नाचे विचारल्यावर तो टाळाटाळ करु लागला. लग्नासाठी तगादा लावल्याने जुनेद याने या तरुणीचा मोबाईल क्रमांक ब्लॅाकलिस्टला टाकला असल्याचे या तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. व्हॉटसअ‍ॅप वरील स्टेटस बघताना जुनेदने शाफिया नामक मुलीशी लग्न ठरल्याचे दिसून आले याबाबत खात्री करण्याकरीता सदर तरुणीने तैहमीना यांना मॅसेज करुन सदरबाबत विचारणा केली तेव्हा जुनेदचे शाफीयासोबत लग्न जमले असून लवकरच त्यांचा साखरपुडा होणार आहे. त्यानंतर अनेक दुसर्‍या मोबाईल क्रमांकावरुन जुनेदशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने फोन उचललाच नाही. त्यामुळे या तरुणीची खात्री पटली की जुनेदने तिला लग्नाचे अमिष दाखवून शारीरीक संबंध ठेवून फसवणूक केली आहे. मग तिने पोलीस ठाणे गाठून लग्नाचे अमिष दाखवून आपल्याशी जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवल्याची तक्रार जुनेद याच्या विरोधात केली आहे. याबाबत सहा. पोलीस निरिक्षक मिलिंद भोसले अधिक चौकशी करीत आहेत. गुन्हा दाखल करुन आरोपी जुनेद काझी याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

48 − = 46