20210617_163434
कोकण ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र रायगड सामाजिक

ई-मेल आयडी हॅक करुन महिलेच्या व्हॉट्सऍपवरुन नातेवाईकांना पाठविले अश्लिल मेसेज, नवी मुंबई सायबर सेलकडून तपासाला सुरुवात

ई-मेल आयडी हॅक करुन महिलेच्या व्हॉट्सऍपवरुन नातेवाईकांना पाठविले अश्लिल मेसेज, नवी मुंबई सायबर सेलकडून तपासाला सुरुवात

पनवेल/ संजय कदम :
सायबर चोरट्यांनी खारघर भागात राहणाऱया एका महिलेचे व तिच्या मुलाचे ईमेल आयडी हॅक करुन त्याद्वारे सदर महिलेच्या व्हॉट्सऍपवरुन त्यांच्या ओळखीतील मित्र-मैत्रीण व नातेवाईकांना अश्लिल मेसेज तसेच शिवीगाळ असलेले मेसेज पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे. सदर महिलने नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर चोरटयावर गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.  
या प्रकरणातील तक्रारदार महिला आपल्या दोन मुलांसह खारघर येथील बेलपाडा भागात राहाण्यास आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या त्यांच्या मुलांचे ऑनलाईन क्लासेस सुरु असल्याने त्यांच्या क्लासेससाठी त्या आपल्या ई-मेल आयडीचा वापर करत होत्या. तर त्यांचा मुलगा देखील स्वत:च्या नावाने तयार केलेल्या ई-मेल आयडीचा वापर ऑनलाईन क्लासेससाठी करत होता. या महिलेचे दोन्ही मुले मागील वर्षभर लॅपटॉप व कॉम्फ्यु्टरवर ई-मेलआयडीचा वापर करुन ऑनलाईन शिक्षण घेतले आहे. मात्र अज्ञात सायबर चोरटÎांनी गत एप्रिल महिन्यामध्ये या महिलेचे व तिच्या मुलाचे ई-मेल आयडी हॅक करुन त्याच्या माध्यमातून नेटवर्कमध्ये फेरफार केला. तसेच त्याचा गैरवापर करुन सदर महिलेच्या  व्हॉट्सऍपवरुन त्यांच्या मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांना अश्लिल व शिवीगाळ असलेले मेसेज पाठविण्यास सुरुवात केली. त्यामुळे नातेवाईक व मित्र मैत्रिणींनी या महिलेला संपर्क साधून याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यांनी त्यातील एक सुद्धा मेसेज पाठविले नसताना, परस्पर त्यांच्या व्हॉट्सऍपवरुन मेसेजेस पाठविण्यात आल्याने त्यांनी याबाबत अधीक माहिती घेतली असता, त्यांचे व त्यांच्या मुलाचे ईमेल आयडी हॅक करुन इंटरनेटचा वापर करुन सदर मेसेज पाठवण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे धाव घेतली. सायबर सेलने केलेल्या प्राथमिक तपासात सदर महिलेचा व त्यांच्या मुलाचा ईमेल आयडी हॅक करण्यात आल्याचे तीन व्यक्तींनी सदर महिलेच्या व्हॉट्सऍपवरुन त्यांच्या नातेवाईक व मित्र मैत्रिणींना अश्लिल व शिवीगाळ असलेले मेसेज पाठविल्याचे आढळुन आले. त्यानुसार सायबर सेलने या प्रकरणात अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

One thought on “ई-मेल आयडी हॅक करुन महिलेच्या व्हॉट्सऍपवरुन नातेवाईकांना पाठविले अश्लिल मेसेज, नवी मुंबई सायबर सेलकडून तपासाला सुरुवात

 1. 1. Вибір натяжних стель: як вибрати ідеальний варіант?
  2. Модні тренди натяжних стель на поточний сезон
  3. Які переваги мають натяжні стелі порівняно зі звичайними?
  4. Як підібрати кольори для натяжної стелі у квартирі?
  5. Секрети догляду за натяжними стелями: що потрібно знати?
  6. Як зробити вибір між матовими та глянцевими натяжними стелями?
  7. Натяжні стелі в інтер’єрі: як вони змінюють приміщення?
  8. Натяжні стелі для ванної кімнати: плюси та мінуси
  9. Як підняти стеля візуально за допомогою натяжної конструкції?
  10. Як вибрати правильний дизайн натяжної стелі для кухні?
  11. Інноваційні технології виробництва натяжних стель: що варто знати?
  12. Чому натяжні стелі вибирають для офісних приміщень?
  13. Натяжні стелі з фотопринтом: які переваги цієї технології?
  14. Дизайнерські рішення для натяжних стель: ідеї для втілення
  15. Хімічні реагенти в складі натяжних стель: безпека та якість
  16. Як вибрати натяжну стелю для дитячої кімнати: поради батькам
  17. Які можливості для дизайну приміщень відкривають натяжні стелі?
  18. Як впливає вибір матеріалу на якість натяжної стелі?
  19. Інструкція з монтажу натяжних стель власноруч: крок за кроком
  20. Натяжні стелі як елемент екстер’єру будівлі: переваги та недоліки
  натяжна стеля ціна https://natjazhnistelifvgtg.lviv.ua .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

29 + = 38