राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
आदिवासी कुटुंबाना खावटी अनुदान वाटप; विशेष योजनेतंर्गत मदत
खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये आरोग्य शिबीर
पनवेल/ प्रतिनिधी :
कोरोना महामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. या परिस्थितीत डोंगर, दऱ्या-खोऱ्यात राहणारा आदिवासी समाज रोजगारापासून सात महिने वंचित राहिला आहे. या आदिवासी कुटुंबाना खावटी अनुदान वाटप विशेष योजनेतंर्गत मदत देण्याचे काम रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या तळोजेमधील राष्टवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहिल्या असताना सदर कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमाला उपस्थित राहून गरजू कुटुंबियांना मदत वाटप करण्यात आले, तसेच तळोजा येथील फेज-१ व फेज-२ येथे खासदार सुनिल तटकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. पनवेल शहर सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आरोग्य शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर आणि नर्स या कोरोना योध्दांचा सत्कार रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी व सामान्य नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी या जनसंपर्क कार्यालयाचा उपयोग होणार असल्याची भावना अदितीतै तटकरे यांनी व्यक्त केली. अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना या योजनेंतर्गत चार हजार रुपये प्रती कुटुंब अनुदान देण्यात आले. यामध्ये २००० रुपयांच्या वस्तू स्वरुपात वाटप आणि २००० इतकी रक्कम बँक / डाक खात्यामध्ये वितरीत करण्यात मान्यता देण्यात आली. उरण तालुक्यातील ९२२ तर पनवेल तालुक्यातील ५ हजार ३६८ नागरिक या योजनेचे लाभार्थी ठरले आहेत. यावेळी पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी खेडेकर, नायब तहसीलदार मांडे, राष्ट्रवादीचे सरचटणीस प्रशांत पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पनवेल अध्यक्ष सतिश पाटील, कार्याध्यक्ष शिवदास काबंळे, सामाजिक न्याय विभागाचे किशोर देवधेकर आदी उपस्थित होते.
остекление квартир
Наша компания обладает важным преимуществом — мы оснащены передовым автоматизированным оборудованием. Благодаря этому мы способны производить качественные и надежные изделия.
Source:
– https://www.veramo.ru/
Localcoinswap (reputable P2P platform) is a reputable P2P exchange where you can buy and sell bitcoins
https://localcoinswap.net