गावातील रस्त्यावरून फार्महाउसवर जाणाऱ्या वाहनापासून होणाऱ्या त्रासामुळे ग्रामस्थांनी तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना दिले निवेदन
पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल तालुक्यातील मौजे : लहान धामणी येथील रहिवाशी यांच्या वतीने गावच्या कायमच्या रहदारीच्या रस्त्यातून फार्महाउसवर जाणाऱ्या वाहनापासून होण्याऱ्या त्रासाबाबत मा. गटविकास अधिकारी, तहसीदार, उपविभागीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे दि.25/6/2021 रोजी निवेदन देण्यात आले होते. परंतु महिना होऊन सुध्दा कोणत्याच कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे गावातील लोकांमध्ये प्रशासना विरूधद नाराजी व्यक्त करत आहेत.
गावकीच्या रस्त्यावरून फार्महाऊसवर जोराच्या स्पीड गाड्या नेत असल्याने गावातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कधी लहान मुलांच्या अंगावर गाडी नेणे, कोंबड्या- बकऱ्या चिरडणे, घराबाहेच्या असणाऱ्या भांड्याचे नुकसान करणे, दादागिरी करणे असे अनेक समस्यांना गावातील ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जाते.
यासंदर्भात फार्महाऊस जाणाऱ्या गावकीचा रस्ता बंद करून पर्यायी रस्ता करण्यास सुचना द्यावे, याकरिता लहान धामणी गावातील ग्रामस्थांनी मा. तहसीलदार, मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मा. प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे.