ग्रामसभा घेण्यासह लाॅकडाऊनच्या काळावधीमध्ये झालेल्या विकास कामांचे ऑडीट करा!
रायगड जिल्हा ग्राम विकास संघर्ष समितीची मागणी
पनवेल/ प्रतिनिधी :
गेल्या दोन वर्षापासून कोवीड- १९ या विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेण्यावर बंदी घातली. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचा आराखडा तयार करणे अवघड झाले आहे. परिणामी, राज्यामधील ग्रामपंचायतीचा विकास करणे थांबला गेला.
तसेच, या कोवीड- १९ या विषाणूच्या काळावधीमध्ये जिल्हा व तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून सरपंच व ग्रामसेवकांच्या अधिकाराने काही ठिकाणी विकास कामे झालेले आहेत. ते विकास कामे लोकहिताचे नसल्याचे ग्रामस्थांकडून आरोप केले जातात. शिवाय, बहुतेक ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांच्या नावाने शासकीय निधीचा अपडा तपडा देखील झालेले आहेत.
या सर्वांचा विचार करून रायगड जिल्हा ग्राम विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष गणपत वारगडा यांनी मा. गटविकास अधिकारी, पनवेल यांच्या मार्फत रायगड जिल्हा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.