Img 20220220 Wa0002
कोकण ठाणे ठाणे ताज्या दिल्ली नवी मुंबई पालघर महाराष्ट्र रायगड सामाजिक

महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते ‘साप्ताहिक, आदिवासी सम्राट’ या वृत्तपत्राचे ९ वे वर्धापनदिन विशेषांकाच प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते ‘साप्ताहिक, आदिवासी सम्राट’ या वृत्तपत्राचे ९ वे वर्धापनदिन विशेषांकाच प्रकाशन

पनवेल/ प्रतिनिधी :
आदिवासी समाजाचे वृत्तपत्र ‘साप्ताहिक, आदिवासी सम्राट’ या वृत्तपत्राचे वर्धापनदिन विशेषांकाच प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते प्रकाशन पुणे येथील भिमाशंकर येथे आदिवासी समाज प्रबोधन महामेळावा या कार्यक्रमात करण्यात आले.
प्रकाशन करतावेळी संपादक, गणपत वारगडा यांच्या पाठीवर हात थोपटून या २१ व्या शतकामध्ये समाजाचे वृत्तपत्र प्रसिद्धी करणे, वेब पोर्टल व यु ट्यूब चॅनेल चालवणे हे खर्ची बाब तर आहेच पण ते सातत्याने टिकवणे ही खरी कसत असल्याचे सांगत श्री. झिरवाळ साहेबांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सामाजिक कार्यकर्ते गणपत वारगडा, जयवंत शिद यांना मार्गदर्शन केले.
यावेळी आदिवासींचा बुलूंद आवाज म्हणून ओळखले जाणारे बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सतिशदादा पेंदाम तसेच विधानसभा, विधान परिषदेचे अनेक आजी- माजी आमदार, राज्यातील आदिवासी समाजातील असणा-या सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, सदस्य, आदिवासी विकास विभागासह विविध विभागातील शासकीय अधिकारी उपस्थित होते.