आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हा कार्यकारीणीसह तालुका कमिट्या केल्या बरखास्त
संस्थापक पञकार गणपत वारगडा यांनी घेतला निर्णय; नव्याने केल्या जातील नियुक्त्या
इच्छुक व धडपडीच्या कार्यकर्त्यांना संघात सभासद होण्याचे केले आवाहन
पनवेल/ प्रतिनिधी :
आदिवासी समाजामध्ये जनजागृती- प्रबोधन तसेच आदिवासींवर होणा-या अन्यायाला वाचा फोडणारी व न्याय मिळवून देणारी आदिवासी सेवा संघाची सन २०१३ साली स्थापना करण्यात आली. शिवाय, आदिवासी सेवा संघाची तात्काळ रजिस्टर नोंदणी केली व महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र निवडुन कोकणामध्ये रायगड, नवी मुंबई, ठाणे व पुणे जिल्हामध्ये जिल्हा व तालुका स्तरावर कमिट्या तयार करण्यात आले.
आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने आदिवासींसाठी जातीचे दाखले, वन दावे, रेशनिंग कार्डचे शिबरे घेत आदिवासींच्या जमिनी संदर्भात सातत्याने लढा लढत राहिलो. त्याच बरोबर सामाजातील युवकांसाठी मार्गदर्शन मेळावे, समाजात संघटीत होण्यासाठी एक गाव – एक संघ उक्ती प्रमाणे आदिवासी समाजातील विनामूल्य क्रिकेट स्पर्धाचे देखील आयोजन केले होते. एवढंच नाही तर योजनांची देखील माहिती देत आलेलो आहोत. अशाप्रकारे संघाचे काम करता करता आदिवासी सेवा संघामध्ये सभासद देखील झपाट्याने वाढू लागले.
माञ, आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गणपत वारगडा यांना पञकारिता क्षेञात अधिक वेळ द्यावा लागत असल्याने संघाची देखील जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा यांनी रविवार, (दि. २० मार्च २०२२) रोजी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या लेटरहेडवर रायगड जिल्हासह तालुका कमिट्या बरखास्त केले असल्याची प्रेस नोट काढण्यात आली आहे. शिवाय, नव्याने जिल्हासह तालुका कमिट्या देखील तयार करणार असल्याचे या काढलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे. तसेच ९८२०२५४९०९ या भ्रमणध्वनी वर संपर्क साधून रायगड जिल्ह्यातील इच्छुक कार्यकर्त्यांना सभासद होण्याचे देखील आवाहन केले आहे.