Img 20220701 Wa0001
कोकण नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल रायगड सामाजिक

महापालिकेची विना परवानगी व बेकायदेशीर देहरंग धरणातील माती उत्खन्न करून माती साठा करणा-यांवर कारवाई करा; आदिवासी सेवा संघाची मागणी

महापालिकेची विना परवानगी व बेकायदेशीर देहरंग धरणातील माती उत्खन्न करून माती साठा करणा-यांवर कारवाई करा; आदिवासी सेवा संघाची मागणी

● पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर व महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिले पञ..

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल महानगरपालिकेचे असणारे देहरंग धरणामध्ये स्थानिक आदिवासींच्या अनेक जमिनी कवडीमोल दरात संपादीत केल्या, माञ या आदिवासींना अद्यापही प्रकल्पग्रस्थ म्हणून दाखले देण्यात आलेले नाहीत. शिवाय, महापालिकेत नोक-या देखील दिल्या नाहीत. म्हणून स्थानिक काही आदिवासी बांधव १ ते २ ब्रास रेती काढून आपले उदरनिर्वाह करत असतात. शिवाय, काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या सांगण्यावरून महसूल विभागाच्यामार्फत या स्थानिक आदिवासींवर ३ ब्रास रेती ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले गेले होते.
परंतु, याच देहरंग धरणामध्ये महापालिकेची विना परवानगी व बेकायदेशीररित्या अनेक व्यावसायिकांनी हजारो ब्रास माती उत्खन्न केले आहे. एवढं नाही तर या काही व्यावसायिकांनी महापालिकेच्या जागेतच माती स्टोक केले असल्याचे समजताच पनवेल तहसील महसूल विभागाच्या अधिका-यांकडून दि. १६ जून २०२२ रोजी अचानक स्थळ पाहणी करण्यात आली. या स्थळ पाहणीत जे.सी.बी., ट्रक, हायवं, ट्राक्टरसह यंञण ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या विना परवानगी व बेकायदेशीरित्या माती उत्खन्न करून माती स्टोक करणा-यांवर आदिवासी बांधवांप्रमाणेच या व्यावसायिकांवर देखील कारवाई करावी, यासाठी आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा, संजय चौधरीसह अन्य आदिवासी बांधवांनी तहसीलदार विजय तळेकर व पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना पञ देऊन मागणी केली आहे.