20190909 235741
उरण ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई पनवेल पश्चिम महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकीय रायगड विदर्भ

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आदिवासी उमेदवारांची यादी…

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आदिवासी उमेदवारांची यादी..

पुणे/ प्रतिनिधी :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळ येत असताना अजून भाजपा, शिवसेनेची युती होईल की नाही? असा प्रश्न चिन्ह निर्माण होवून काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष तसेच त्यांच्या समविचारी पक्षांची आघाडी होईल की नाही? याचा ही कुठे अंदाज लागत नसल्याने या राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून राहिले आहेत. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वंचित बहुजन आघाडी यांची सुद्धा कुठे हालचाली दिसून येत नाहीत.
माञ, असे असले तरी या 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाजाची ताकद दाखवण्यासाठी आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी समन्वय समिती स्थापन करण्यात आली. आदिवासी समाजाची दखल राजकीय पक्षांनी घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघात आदिवासी उमेदवार उभे करणार असल्याने ही समिती काही महिन्यांपासून आदिवासी उमेदवारांची शोध मोहिम घेत होती.
इच्छुक उमेदवारांची यादी तयार करून उमेदवारांच्या काही दिवसापूर्वी पुणे येथे मुलाखती घेण्यात आल्या. तसेच घेतलेल्या मुलाखतीतूनच काल आदिवासी समन्वय समितींनी पुणे येथे पञकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघात डाॅ. हिरा नेतम पावरा, बागलाणमधून संजय जोपळे, जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघात राहूल सुपडू सोनार, यवतमाळमधून कृष्णा भिवणकर तर रायगड जिल्ह्यातील पेण विधानसभा मतदार संघातून सुनिता पवार व पनवेल विधानसभा मतदार संघातून संजय चौधरी हे इच्छुक असल्याने या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
या निवड समितीमध्ये मेमाणे सर, बाळकृष्ण मते, डि.बी. घोडे, अॅड. डामसे, लक्ष्मण भालेकर, दूंदा मोरे, अजय अत्राम, प्रा. सोमनाथ कातडे, महादेव कोकणे, रामदास शिंदे, माधव थैल, भरत मते, खेवजी भोईर, डॉ.पेढेकर आदी. समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.

One thought on “2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आदिवासी उमेदवारांची यादी…

  1. यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुका मद्वे BJP चा उमेदवार
    सुरज घनश्याम राठोड conform केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि नितीन गडकरी यांनी सांगितले भाषण मद्वे नाही तर यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही विधान सभा देऊ शकणार असे स्पष्ठ झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

52 + = 62