Img 20190909 Wa0035
ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड

तालुका पोलीस ठाण्यातर्फे नागरिकांमध्ये करण्यात आली जनजागृती

तालुका पोलीस ठाण्यातर्फे नागरिकांमध्ये करण्यात आली जनजागृती

पनवेल/ प्रतिनिधी :
गणेशोत्सवाचे औचित्य साधून पनवेल तालुका पोेलीस ठाण्याचे वपोनि अशेाक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ व त्यांच्या पथकाने सायबर क्राईम अभियान राबविले. यामध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पनवेल तालुका मधील पोयंजे येथील वस्तुशीद्धी को.ऑ.हौ.सोसायटी गणेश मित्र मंडळ द्वारे गणेशोत्सव महोत्सवानिमिताने सायबर क्राईम जनजागृती व्हावी याबाबत पनवेल तालुका पोलिस ठाणे अंतर्गत पोयेंजे बीटचे अधिकारी स.पो.नि. गोपाळ, पो.ना. चव्हाण यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सागर भोसले यांनी मोठ्य प्रमाणात सहकार्य केले.
सोसायटी मधील रहिवाशांना पोलिसांनी सायबर क्राईम म्हणजे काय ? व यापासून घडणार्‍या गुन्ह्यामुळे आपण पीडित होऊ नये याबाबतचे महत्त्व पटवून देवून सायबर गुन्हे विषयी शिक्षण किती महत्वाचे आहे हे सांगून जनजागृती करण्यात आली सदर कार्यक्रमास बर्‍याच महिला व पुरूषांनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 22 = 26