Screenshot_20220823-193601_Google
ताज्या पनवेल सामाजिक

पनवेल परिसरात गाड्यांचे सायलेन्सर चोरणाऱ्यांचा सुळसुळाट

पनवेल परिसरात गाड्यांचे सायलेन्सर चोरणाऱ्यांचा सुळसुळाट

पनवेल/ संजय कदम :
गेल्या काही दिवसापासून पनवेल परिसरात दुचाकी व चार चाकी वाहनांचे सायलेन्सर चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पनवेल परिसरात सुद्धा दोन वाहनांचे ५०,००० रुपये किमतीचे सायलेन्सर चोरीस गेले आहेत.
Screenshot_20220823-193601_Googleतालुक्यातील देवळोली गावातील कैलास पाटील यांनी त्यांची इको टॅक्सी घरासमोरील मोकळ्या जागेत उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने २५,००० रुपये किमतीचा सायलेन्सर चोरून नेला आहे तर दुसऱ्या घटनेत सुरेश गव्हाणकर यांच्या मालकीच्या इको टॅक्सी चा सुद्धा २५,००० रुपये किमतीचा सायलेन्सर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.