IMG-20220916-WA0008
ठाणे पालघर सामाजिक

आदिवासी डीएड, बीएड पात्रता धारकांचा चलो आझाद मैदानचा नारा

आदिवासी डीएड, बीएड पात्रता धारकांचा चलो आझाद मैदानचा नारा

पालघर/ प्रतिनिधी :
अनुसूचित जमातीची (पेसा) १३ जिल्हा परिषदामध्ये ४८४९ पदे रिक्त असून, पालघर जिल्ह्यासह पेसा क्षेत्रातील १३ जिल्ह्यांचा शिक्षक पदभरतीचा कालबध्द कार्यक्रम तत्कालीन शिक्षण मंत्री यांनी आयुक्तांना शासनाला सादर करायला सांगितला. शालेय शिक्षण विभाग ने मंजुरी दिल्यानंतर सामान्य प्रशासन विभाग,विधी व न्याय विभाग यांनी मंजुरी दिली परंतु वित्त विभागात त्रुटी निघाल्यामुळे त्याची पूर्तता करून वित्त विभागाने सादर करायला सांगितली.
IMG-20220916-WA0007शालेय शिक्षण विभागाने आयुक्त, शिक्षण यांच्याकडे त्रुटी पूर्ततेसाठी पत्र दिले पण अद्याप त्याची पूर्तता झाली नाही.शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन अद्याप केलेले नाहीत. पालघर जिल्ह्यात बदली झालेल्या शिक्षकांना सोडलं जात नाही त्यामुळे भरती करायची नाही का असा सवाल पात्रताधारक यांच्याकडून केला जातो आहे. या बाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या व सरकारच्या दूर्लक्षामुळे आज आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करावे लागत आहे असे मत समितीचे अध्यक्ष दामू मौळे यांनी व्यक्त केले.
मागील वर्षी एन दिवाळी सणाच्या दिवशी समितीच्या मार्फत ह्या मागण्या करिता 17 दिवसांचे बेमुदत आमरण उपोषण झाले आज त्या आंदोलनाला या दिवाळीत वर्ष होईल पण सरकार आणि प्रशासन आदिवासी बाबत किती उदासीन आहे हेच यारून दिसून येते.त्यामुळे १९ सप्टेंबर ला आझाद मैदान मुंबई येथे समितीच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

————————–
“जो पर्यंत मागण्या वित्त विभागाची मंजुरी मिळत नाही, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी परीक्षेचे आयोजन करणे, बदली झालेल्या शिक्षकांना सोडून त्या जागा रिक्त करण्यात याव्यात म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत या करिता १३ पेसा क्षेत्रातील पात्रता धारक येतील.
– रुपाली मेघा, महिला अध्यक्षा
———————