Photo 2019 09 05 22 15 59
ठाणे ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई राजकीय रायगड

संविधान व एस.सी / एस.टी. चे  आरक्षण कोणीही बदलू शकत नाही

संविधान व एस.सी / एस.टी. चे  आरक्षण कोणीही बदलू शकत नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/ प्रतिनिधी :
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना महायुती चे सरकार निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या विधानसभा निवडणुकित रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निश्चित निवडून येतील  असा विश्वासाचा शब्द  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिला. भाजप सेनेचे सरकार आले तर संविधान बदलणार आरक्षण हटवणार असा विरोधी पक्ष आरोप करीत असतो. त्यांना सांगा आता या आरोपाची टेप जुनी झाली.
संविधान हे आमचे गीता बायबल कुराण आहे. आता संविधान कोणी बदलू शकत नाही; एस. सी. व एस. टी.चे आरक्षण कोणी बदलू शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. रामदास आठवलें सारखे नेते महायुती सोबत असताना जन्मात कोणी आरक्षण बदलण्याचा विचार करू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाची शपथ घेऊन कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे कोणीही कधीही संविधान बदलणार नाही आणि आरक्षण हटविणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वरळी येथील एस. एस. सी. आय. च्या डोम हॉल मध्ये रिपाइं च्या मुंबई प्रदेश च्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विचरामंचावर राज्याचे कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, ना. सुरेश खाडे, राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार राहुल शेवाळे, सौ. सिमाताई आठवले, पूज्य भन्ते राहुल बोधी गौतम सोनवणे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

45 + = 52