IMG-20230131-WA0001
अलिबाग नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न

शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न

कळंबोली/ प्रतिनिधी :
कळंबोली येथे शनिवार (दि. २७ जाने.) रोजी इयत्ता दुसरी या वर्गाची पालक सभा घेण्यात आली. या सभेला अध्यक्ष शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक श्री. सतीशजी पाटील व संचालक श्री. सनीजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

IMG-20230131-WA0002 शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या मध्ये अतूट नातं असले पाहिजे. शिवाय, लहान मूल अनुकरणातून शिकतात. त्यामुळे त्यांच्या समोर वावरताना प्रत्येकांनी काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांचा अभ्यास व शालेय शिस्त जीवनात का उपयोगी आहे तसेच पालक या नात्याने मुलांना न मारता समजून घेणे. तसेच विद्यार्थीच्या अडचणी समजून घेऊन त्यावर सखोल असे मार्गदर्शन करून पालकांना प्रेरित केले पाहिजे असे सौ. भोसले मॅडम यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.

तसेच सौ. सुर्यवशी मॅडम व उज्ज्वला मॅडम यांनी पालकांना मार्गदर्शन करत मुखध्यापीका सौ. भोळे मॅडम यानी पालकांना मुलांच्या सुरक्षिते विषयी माहिती सांगून मार्गदर्शन केले पालकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय योजना कशा करायच्या हे सांगून उपस्थित पालकांचे व सभेचे अध्यक्ष यांचे आभार मानत पालक सभा संपली असे जाहीर केले. तर उपस्थित सर्व पालकांचे स्वागत श्री. बबन निरगुडा यांनी शब्द सुमनानी केले.

Calendar 2023png Adivasi Dindarshika
यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. नीलिमा भोळे व दुसरी तुकडी अ/ब /क /ड चे वर्गशिक्षक अनुक्रमे सौ. भारती पाटील, श्री. बबन निरगुडा, सौ. चारुशीला सुरवंशी, उज्वला मॅडम देखील उपस्थित होत्या.

adivasi logo new 21 ok (1)