Img 20190913 Wa0190
अलिबाग उरण कर्जत ताज्या नवी मुंबई पनवेल पेण माथेरान राजकीय रायगड सुधागड- पाली

शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व- आमदार जयंत पाटील

शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन.
——— प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व ——- 

———————————————–
राजकारणात चढ उतार येतात. हार पराजय होत असते. परिस्थिती बदलत असते. शेकाप हा निष्ठावंत कार्यकर्यांचा पक्ष आहे हे इथल्या कार्यकर्त्यांची आजवर दाखवून दिले आहे. पनवेलमध्ये शेकापचा दबदबा आजही कायम आहे. भविष्यात सुद्धा राहणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. असे झाले तर येथे बदल, सत्ताबदल निश्चित होईल. प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व आहे. त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. 
– आमदार, जयंत पाटील
——————————————

पनवेल/ प्रतिनिधी :
शेतकरी कामगार पक्षाच्या नूतन कार्यलयाचा उदघाटन सोहळा आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते माजी आमदार विवेक पाटील, कोकण शिक्षक मतदार संघ आमदार बाळाराम पाटील, पनपचे माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे , जेष्ठ नेते मा. तालुका चिटणीस नारायण घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुशरणम सोसायटी, मार्केट यार्ड रोड, विश्राळी नाका, पनवेल येथे पार पडला. यावेळी मी शेतकरी चळवळीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे.
शेतकरी कामगार पक्ष हा एक वेगळ्या धाटणीचा पक्ष आहे, शेकाप हा कधीच मेगाभरती करीत नाही. तो कार्यकर्त्यांची घडवणुक करतो. शेकापचे एक वैशिष्टय आहे. तो मेगाभरती न करता एक चांगला कार्यकर्ता घडवतो. असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नूतन कार्यलयाचा उदघाटन सोहळ्याप्रसंगी केले.
शेतकरी कामगार पक्षाचे आधीचे कार्यालय हे नादुरुस्त झाल्याने त्या कार्यालयात अस्वस्थता जाणवू लागली होती. अशा कार्यालयात काम करण्यास कोणालाही उत्साह वाटत नव्हता. त्यामुळे शेकापचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांच्या संकल्पनेतून शेतकरी कामगार पक्षाचे नुतन कार्यालय साकारले. नवीन कार्यालयातून जास्तीत जास्त विकास कामे कार्यकर्त्यांच्यातून होतील अशी सर्वांनाच खात्री असल्याचे मत माजी तालुका चिटणीस नारायण घरत यांनी व्यक्त केले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन जयंत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधिताना केले.
याप्रसंगी पनवेल विधानसभा मतदार संघ अध्यक्ष काशिनाथ पाटील, पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी अध्यक्ष रवी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र पाटील, पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, भातगीरणी संस्था चेरमन एम सी पाटील, सहचिटणीस आर.डी .घरत, आरिफ पटेल, पनवेल कार्यालयीन चिटणीस जितेंद्र म्हात्रे, पनवेल पंचायत समिती सभापती प्रणाली भोईर, शेकाप महिला आघाडी अध्यक्षा प्रिया मुकादम, पनवेल महानगरपालिका जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा अनुराधा ठोकळ, माधुरी गोसावी, नगरसेवक गोपाळ भगत, नगरसेवक अरविंद म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक विष्णू जोशी, नगरसेवक बबन मुकादम, नगरसेवक प्रमोद भगत, नगरसेवक रवींद्र भगत, नगरसेवक गुरुनाथ गायकर, नगरसेवक  अजिज मोहसिन पटेल, नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, नगरसेविका प्रज्योती म्हात्रे, नगरसेविका प्रिती जॉर्ज (म्हात्रे), नगरसेविका सारिका भगत, नगरसेविका कमल कदम, नगरसेविका उज्ज्वला पाटील, नगरसेविका नगरसेविका जयश्री म्हात्रे, नगरसेविका अरुणा दाभणे, नगरसेविका राणी कोठारी, नगरसेविका प्रिया भोईर, प्राध्यापक जाधव , शेकाप प्रप्रवक्ते राजेंद्र कोरडे, जेष्ठ पत्रकार माधव पाटील, डॉ. हितु शहा आदी रा.जि .प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रा.पं .सरपंच, ग्रा.पं .सदस्य आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.