Img 20210503 Wa0014
ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रायगड रायगड सामाजिक

नवी मुंबई व रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आदिवासी संस्कृती, पारंपारिक पध्दतीने लागले लग्न

रायगड व नवी मुंबई जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आदिवासी संस्कृती, पारंपारिक पध्दतीने लागले लग्न

हरि काष्टे व गीता भस्मा यांनी घडवून आणला समाजात नवा आदर्श; समाजात दोघांचेही केले जातेय गुणगान

पेण/ प्रतिनिधी :
रायगड जिल्हयातील पेण सातेरी येथे वर हरि काष्टे, वधू गीता भस्मा यांचा लॉकडाऊनच्या नियमाचे काटेकोर पालन करून सोशल डिशटिंगचे तंतोतत पालन करून फक्त २५ जणांच्या उपस्थितीत रविवार (दि. २ मे) रोजी पेण येथील सातेरी या गावामध्ये आदिवासी संस्कृती व पारंपारिक पध्दतीने लग्न सोहळा पार पाडण्यात आला.
यापूर्वी नवी मुंबई व रायगड जिल्हयात आदिवासी पध्दतीने लग्न लावण्यात आले नाही. त्यामुळे आदिवासी पध्दतीच्या लग्नाविषयी बहुतांश आदिवासी बांधव संभ्रमित होते. आदिवासी पध्दतीने कसे लग्न लावले जातील असा प्रश्न निर्माण देखील झाला होता. शिवाय, आदिवासी संस्कृती, पारंपारिक पध्दतीने लग्न कार्य करण्याचे अनेकांच्या मनी विचार होते, पण प्रत्यक्ष आदिवासी पध्दतीने लग्न लावण्याचे धाडस कोणीही करायला तयार नव्हते. माञ, ते धाडस केले ते रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील आसाणी व सातेरी या गावातील युवती व युवकांनी. हरि जोमा काष्टे यांनी सातेरी येथील गीता जोमा भस्मा या युवती बरोबर आदिवासी पध्दतीने लग्न लावून वैवाहिक जीवनाला आपली सुरूवात केली आहे. त्यामुळे नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यात संपूर्ण आदिवासी समाजाला आदर्शवत असा विवाह सोहळा ठरला आहे.
या विवाह सोहळयासाठी समाजातील काहीकांनी विरोधी देखील केला. माञ, हरि काष्टे यांनी आपल्या मिञांच्या साथीने स्वतःचे लग्न आदिवासी संस्कृती, पारंपारिक पद्धतीने करून दाखवले. त्याकरिता हरि काष्टे व गीता भस्मा यांच्या कुटुंबातील सदस्यांसहीत लक्ष्मण निरगुडा, कृष्णा खाकर, देहू ठोंबरे, तुषार कडू, धाऊ ठोंबरे, नागेश निरगुडा, जोमा ठाकरे यासह अनेक मित्रमंडळीनी आदिवासी संस्कृती, पारंपारिक पध्दतीने लग्न सोहळा संपन्न होण्यासाठी कठोर प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 16 = 23