ग्रामपंचायत कारभार पारदर्शक करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्य उषाताई गणपत वारगडा यांची मासिक सभेत लेखी मागणी…!
————–
विशेष म्हणजे थेट सरपंच सीताराम जानू चौधरी यांनी उषाताई गणपत वारगडा यांच्या लेखी मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन अर्ज मंजूर केल्याच्या सुचना ग्रामसेवकाला दिल्या. मात्र तरीही काही जुन्या जाणत्या मंडळींचा अनपेक्षित विरोध पाहून ग्रामस्थ देखील हैराण झाले. नव्या काळानुसार आता ग्रामीण जनता जागृत झाली आहे. आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उषाताई आणि लोकप्रिय सरपंच सिताराम चौधरी यांनी नव्या कारभारात जनतेला उत्तम प्रशासन आणि पारदर्शक कारभार अशा द्विसूत्री कार्य पद्धतीने सुरु केलेला कारभार लोकाभिमुख करण्याचा आरंभ केल्याची चर्चा पंचक्रोशीत सुरु आहे.
————–
पनवेल /प्रतिनीधी :
पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माळडुंगेच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, आदिवासी महिला मंडळ अध्यक्ष उषाताई गणपत वारगडा यांनी ग्रामपंचायत कारभार पारदर्शक होण्यासंदर्भात एक लेखी विनंतीवजा अर्ज ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांना मासिक सभेत दिला आहे.
ग्रामपंचायत सभा, ग्रामसभा याचे प्रोसिडींग आठवडा अगोदर देणे व तात्काळ प्रसिद्ध करणे, वेळेत इतिवृत्त भरणे, आवक जावक रजिस्टर नोंदी अद्ययावत राखणे, घरपट्टी नोंदी मासिक सभेत मंजूर करूनच करणे, जलजीवन योजने बाबतीत आलेल्या तक्रारीबाबत अहवाल करून त्याचा संबंधित खात्याकडे पाठपुरावा करणे, ग्रामपंचायत कारभारात सर्व स्थानिक नियुक्त प्रतिनिधीना विश्वासात घेऊन कामकाज करणे अशा मागण्या उषाताई यांनी केल्या. विशेष म्हणजे थेट सरपंच सीताराम जानू चौधरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन अर्ज मंजूर केल्याच्या सुचना ग्रामसेवकाला दिल्या. मात्र तरीही काही जुन्या जाणत्या मंडळींचा अनपेक्षित विरोध पाहून ग्रामस्थ देखील हैराण झाले.
खरं तर शासनाच्या ग्रामस्वराज संकल्पनेला अनुरूप ह्या सूचना ग्रामस्थ्यांच्या देखील हिताच्या आणि शासकीय कामकाजसाठी नियमानुसार गरजेच्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात या मागणीचे मोठे कौतुक होत आहे. गटविकास अधिकारी पनवेल पंचायत समिती आणि रायगड जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारीना या पत्राच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत.