नवीन पनवेल पनवेल महाराष्ट्र रायगड

केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते गायिका उषा गणपत वारगडा यांना “गान रत्न गौरव” पुरस्काराने सन्मानित..

केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते गायिका उषा गणपत वारगडा यांना“गान रत्न गौरव”पुरस्काराने सन्मानित..Img 20250113 Wa0000

 

पनवेल/ सुनील वारगडा :
प्रशिक एज्यूकेशन सोसायटी २००६ साली स्थापना करण्यात आली. शैक्षणिक, पत्रकारिता, सामाजिक कार्य, डॉक्टर, गायन या सारख्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला व पुरुषांचे मान सन्मान प्रशिक एज्यूकेशन सोसायटीच्या माध्यमातून दरवर्षी “प्रशिक सन्मान” नावाने गौरविण्यात येत असते. या “२०२४ प्रशिक सन्मान” कार्यक्रमात आदिवासी समाजातील गायिका उषा गणपत वारगडा यांना गायन क्षेत्रातील गान रंजना शिंदे स्मृती गानरत्न गौरव पुरस्कार केंद्रिय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते रविवार (दि. १२ जाने.) रोजी सन्मानित करण्यात आले.
उषा गणपत वारगडा या सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. शिवाय त्या मालडुंगे ग्रुप ग्रामपंचायत येथील सदस्या आहेत. त्या आदिवासी महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. उषा गणपत वारगडा यांनी आदिवासी समाजात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने अनेक गाणी समाजाच्या आधारावर गायली आहे. त्याचबरोबर मनोरंजन म्हणून अन्य गाणी गायली असून युट्यूब व इस्ट्राग्राम सारख्या सोशियल मिडीयावर व्हिडिओ गाणी पाहायला मिळतात. या सर्वांचा दखल घेऊन प्रशिक एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन, लोकशिक्षक मोहन गायकवाड व देविदास गायकवाड यांनी गायन क्षेत्रामध्ये आदिवासी समाजातील गायिका म्हणून गानरत्न गौरव पुरस्कारासाठी निवड करून केंद्रिय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते अखेर उषा गणपत वारगडा यांना गौरविण्यात आले.