मंथन सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये कु. जय पोपट गळवे हा महाराष्ट्र राज्यात पाचवा
कळंबोली/आदिवासी सम्राट :
मंथन सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल (मराठी माध्यम) कळंबोली शाळेतून ७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ७८ पैकी ७८ विद्यार्थी चांगल्या गुणाने पास झाले शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून त्यामधून कु. जय पोपट गळवे हा महाराष्ट्र राज्यात पाचव्या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन शाळेचे नाव महाराष्ट्रभर उज्वल केले असून शाळेतून टॉप टेन मध्ये काही विद्यार्थ्यांनी आपले नाव कोरले आहे.
तसेच प्रथम दहा क्रमांकामध्ये १.जय गळवे २९२-९७.३३% २.आरती कदम २७८-९२.६७% ३.समर्थ इंगळे २२४-७४.६७% ४. वीर शिंदे २१२-७०.६७% ५. आयुष ठोंबरे २१०-७०.००% ६.भुमिका माने २००- ६६.६७% ७.कन्हैया फड १९८.६६.०० % ८. विभूती मुटकुळे १९४-६४.६७ % ९. वेदिका मिसाळ १९४- ६४.६७% १०. आरोही आयनुले १९२-६४.००% ११. त्रिशा मोळावडे१९५-६४.००% यशस्वी यशस्वी विद्यार्थ्यांच्या मागे संस्थेचे संस्थाचालक माननीय श्री सतीश पाटील सर यांचे विद्यार्थ्यांना योग्य असे सहकार्य व मार्गदर्शन लाभले तसेच पूर्ण शालेय कमिटीचे योग्य वेळी योग्य सहकार्य व मार्गदर्शन लाभले इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक सौ. भारती पाटील मॅडम, सौ. उज्वला लावंड मॅडम, सौ. चारुशीला सूर्यवंशी मॅडम तसेच श्री. बबन निरगुडा सर यांचेही विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व सहकार्य लाभले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.