Cough
ताज्या

कफ सामाजिक संस्थे ची माजोरी कायम

पनवेल पालिका आयुक्तांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली…

पनवेल(प्रतिनिधी)
येथील कोझी नुक सोसायटीमध्ये उघडण्यात आलेल्या सिटीजन युनिटी फोरम ( कफ ) च्या अनधिकृत कार्यालयाचे आज मोठ्या दिमाखात उदघाटन करण्यात आले. सदर कार्यालयासाठी सुरू करण्याकरता सोसायटी ची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता निवासी इमारती मध्ये चालू करण्यात आले. याची कोझीनुक सोसायटी च्या सदस्यांनी फोरम ला नोटीस देऊन , पनवेल महापालिका आयुक्त यांना निवेदनही सादर केले होते त्यावर पालिका आयुक्त श्री गणेश देशमुख यांनी सदर कार्यालय अनधिकृत असून त्याचे उदघाटन होऊ न देता , तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.परंतु नोटीस बजावून ही फोरम ने त्या आदेशाला केराची टोपली दाखवत मागरूरीत मोठ्या दिमाखात कार्यालयाचे उदघाटन केले.

आश्चर्याची बाब म्हणजे काही पालिका सदस्यांनी ही या अनधिकृत सभारंभास आपली उपस्थिती दर्शवल्याने रहिवाशी आवाक झाले. हे सदस्यसच तर त्यांना पाठीशी घालत तर नाही ना? की त्यामुळे प्रत्यक्ष पालिका आयुक्तांच्या आदेशाला ही हरताळ फसण्याची फोरम ची हिम्मत होते? असा प्रश्न तेथील राहिवाश्याना पडला आहे.

सिटीजन युनिटी फोरम चे च काही सदस्य हे पनवेल महापालिकेने स्थापित केलेल्या एन जी ओ ग्रुप चे सदस्य ही आहेत. आणि त्यांनीच पालिका आयुक्तांचा स्पष्ट आदेश धुडकावून जाहीर उदघाटन सभारंभ मोठ्या दिमाखात साजरा केला. आता पनवेल महापालिका कफ वर काय कारवाई करणार याकडे तेथील स्थानिक राहिवाश्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

39 + = 40