IMG-20190810-WA0034
ताज्या पनवेल

पनवेलमध्ये ग्रामीण भागात जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गावं- गाव ठिकाणी काढल्या बाईक रॅल्या….

  • पनवेलमध्ये ग्रामीण भागात जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गावं- गाव ठिकाणी काढल्या बाईक रॅल्या….
  • जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी सम्राट न्यूज वेब पोर्टल व आदिवासी न्यूज व इंटरर्टमेंटची केली ओपनिंग.
पनवेल/सुनील वारगडा ..
      संयुक्त राष्ट्र संघाच्या ठरावात 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून असा ठराव मंजूर झाला. त्यामुळे हा 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, पेण, उरण, खालापूर, सुधागड पाली ह्या तालुक्यात सुद्धा आदिवासींच्या विविध संघटना, संस्था एकञ येवून जागतिक आदिवासी दिन जल्लोष मध्ये सगळीकडे साजरा केला करण्यात आले.
         पनवेल तालुक्यातील गाढेश्वर- मालडूंगे- धोदाणी हा भाग बहुल आदिवासी भाग ओळखला म्हणून ओळखला जातो. या आदिवासी भागामध्ये शिक्षणाची प्रगती मोठ्या प्रमाणात दिसत असली तरी समाज जनजागृती व प्रबोधन कमी असल्याचे दिसून येते. याच कारण असं की, या ठिकाणी अधिक लोकं ही राजकारणी पक्षाच्या निगडीत आहेत. त्याकरिता समाज एकञ येणं नेहमी अवघड होते. याचाच फायदा राजकारणी पुढारी व बोगस आदिवासी घेत असल्याचे वस्तुस्थिती आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षापासून जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने या आदिवासी भागात बाईक रॅल्या काढून समाज जनजागृती व प्रबोधन करण्याचं काम येथील तरूण वर्ग करत आहेत. या बाईक रॅल्यात जेष्ठ नागरिकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
       जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी धोदाणी- मालडूंगे येथील नाग्या महादू कातकरी हुतात्मा चौकात सर्व एकञ आले. या हुतात्मा चौकाला सकाळी 9.30 वा. मानवंदना करून छञपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, जननायक भगवान बिरसा मुंडा, जंगल सत्याग्रहमध्ये हुतात्मा झालेले नाग्या कातकरी व पद्या ठाकूर यांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणापासून बाईक रॅली काढण्यात आली. गाढेश्वर येथे सुद्धा गावातील सर्व महिला व ग्रामस्थ एकञ येवून जागतिक आदिवासी दिनाचा  कार्यक्रम चालु असल्याने बाईक रॅली सुरूवातीला गाढेश्वर या ठिकाणी काढण्यात आली. या कार्यक्रमात बहुतांश कार्यकर्त्यांचा स्वागत येथील ग्रामस्थांकडून करण्यात आले. नंतर मालडूंगे हद्दीत असणारे गावं धामणी- देहरंग- बापदेववाडी- हौषाचीवाडी- बापदेववाडी- कोंडीचीवाडी- मालडूंगे- टावरवाडी- सतीचीवाडी- ताडपट्टी- कोंमलटेकडी- वाघाचीवाडी- पिंपळवाडी या गावा गावात जनजागृती रॅली काढून धोदाणी या गावात समाप्ती झाली. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खैर, शंकर घुटे, सिताराम चौधरी, राम भस्मा, पद्माकर चौधरी, विष्णू सपरा, चंद्रकांत सांबरी, रमेश भस्मा, नारायण चौधरी या सारखे अनेक आदिवासी कार्यकर्त्यांनी आदिवासी समाजाबद्दल भाषणं व मनोगत व्यक्त केली.
         तसेच या जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पञकार गणपत वारगडा यांनी आदिवासी समाज चळवळीचे सोशियल मिडीयाचा भाग म्हणून आदिवासी सम्राट न्यूज वेब पोर्टल व आदिवासी न्यूज व इंटरर्टमेंट यू टूब चॅनेलच ओपनिंग करून याच्या माध्यमातून आदिवासीच्या अडचणी, चालीरीती- परंपरा तसेच आदिवासीचे मनोरंजन सारखे व्हिडिओस् दाखविण्याचे प्रयत्न करू, असे गणपत वारगडानी सांगितले. या रॅलीमध्ये  मालडूंगे येथील उपसरपंच राजू वाघ, सदस्य जनार्दन निरगुडा, रमेश आवाटी सामाजिक कार्यकर्ते सी. के.वाक, आर. डी. वाक, संजय चौधरी, सोमनाथ चौधरी, काळूराम वाघ, अर्जुन घुटे, सुनिल वारगडा, जनार्दन घुटे, रोशन घुटे, किरण ढुमणा, दशरथ पारधी, गौरव दरवडा, लहू उघडे, सिताराम कामडी आदी. शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

One thought on “पनवेलमध्ये ग्रामीण भागात जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गावं- गाव ठिकाणी काढल्या बाईक रॅल्या….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

94 − 91 =