SAVE_20191107_173400
ताज्या नेरळ माथेरान सामाजिक

माथेरानमध्ये पर्यटकांची दिशाभूल थांबिवण्यास पालिका सरसावली!

  • माथेरान पोलिसांनीही घेतली कठोर भूमिका

माथेरान/ मुकुंद रांजाणे :
माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीनाका येथील वाहनस्थळावर पर्यटकांची फसवणूक होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या त्याची दखल घेताना माथेरानच्या नगराध्यक्षा सौ. प्रेरणा सावंत यांनी स्वतः ह्याची शहानिशा करताना त्यात तथ्य आढळल्याने माथेरान पालिकेतर्फे मुख्याधिकारी श्री.रामदास कोकरे यांनी जिल्हाधिकारी तसेच रायगड पोलीस अधीक्षक यांच्या कडे लेखी स्वरूपात ह्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती त्यानुसार येथे मागील दोन दिवसांपासून माथेरान पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली असून आतापर्यंत अकरा जणांवर कारवाई केली आहे.
माथेरानची मिनीट्रेन बंद असल्याने येथील व्यवसायावर गदा आली असून दिवाळी हंगामावर मंदीचे सावट आहे हा हंगाम मुख्यतः गुजरात येथून आलेल्या पर्यटकांवर अबलंबून असतो व हे सर्व पर्यटक मिनीट्रेन सफारी साठी माथेरानला येत असतात व हीच सेवा बंद असल्याने व माथेरानबद्दल जास्त माहिती नसल्याने हे पर्यटक ह्या फसवणूक करणाऱ्या लोकांचे इझी टार्गेट होत आहेत, प्रवेशद्वारावरच पर्यटकांना चुकीची माहिती देऊन त्यांच्याकडून माथेरान मधील चुकीचे पॉईंट दाखवून पैसे उकळले जात असल्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झालेली होती व ह्यावर कळस म्हणजे काही पर्यटकांना येथे राहू नका तुमचे पैसे वाचविण्यासाठी कमी पैशात येथील बावीस पॉईंट दाखवतो व पुन्हा वाहनस्थळावर सोडतो असे हि प्रकार सुरु झाले होते ज्यामुळे माथेरानमधील व्यावसायिक हि ह्या प्रकारामुळे चिडले होते, वाहनस्थळावर स्वतःची गाडी घेऊन येणाऱ्या पर्यटकाना ह्या गोष्टीचा जास्त फटका बसत होता गाडी वाहनस्थळावर येताच घोडेवाले, रिक्षावाले, कुली व दलालांचा विळ्ख्यास त्यांना सामोरे जावे लागत होते व ह्या सर्वांच्या मिलीभगत मुळे त्यांना चुकीची माहिती देऊन फसवणूक केली जात होती त्याचा विपरीत परिणाम माथेरानच्या पर्यटनावर जाणवू लागला होता येथून जाणारे पर्यटक पुन्हा माथेरानला न येण्याचा संदेश घेऊनच जात होते.
त्यामुळेच माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनीही स्वतः पर्यटकांशी बोलून हि फसवणूक खरी असल्याची खात्री करून घेतली व त्यानुसार माथेरानपालिकेतर्फे कठोर निर्णय घेताना येथील वाहनस्थळावर ह्या लोकांना बंदी लागू केली आहे तर येथे नवीन दरपत्रक लावून पालिकेतर्फे गाईड ची व्यवस्थाही सुरु केली आहे. माथेरानच्या अश्वपालक संघटनेच्या अध्यक्षा आशाताई कदम याही या फसवणुकीविरोधात आक्रमक झाल्या असून अशा लोकांवर कारवाई व्हावी ह्यावर त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.
माथेरानमधील हातरिक्षा चालक हि ह्यामध्ये आपले हात चोळून घेत असून वाहनस्थळ ते बाजारपेठ ह्या दरम्यान सातशे ते प्रसंगी हजार रुपये हि घेतले गेले आहेत सध्या हातरिक्षावर यवतमाळ व नांदेड येथील मजूर आले असून त्यांना माथेरानच्या पर्यटनाचे काहीही सोयरसुतक नसून आठ महिन्यांमध्ये जास्तीत जास्त पैसे कमवून जायचे हे त्यांचे लक्ष असल्याने ते पर्यटकांची लूट करण्यात मागे नाहीत.
मागील दोन दिवसांपासून पोलिसांनी सुरु केलेल्या धडक कारवाईने ह्या दलालांचे धाबे दनादले असून माथेरानचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र राठोड प्रशांत गायकवाड, राहुल पाटील, राहुल मुंडे हे सकाळपासून माथेरानमधील विविध ठिकाणी जाऊन फसवणूक करणाऱ्या लोकांची चौकशी करीत असून दोषी आढळल्यावर त्यावर कारवाई करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 1 = 5