20191111 101759
ताज्या नवी मुंबई पनवेल

अनधिकृत मोबाईल टाॅवरवर धडक कारवाई; 65 अनधिकृत मोबाईल टाॅवर केले सील

अनधिकृत मोबाईल टाॅवरवर धडक कारवाई; 65 अनधिकृत मोबाईल टाॅवर केले सील

खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल येथील 65  अनधिकृत मोबाईल टाॅवरवर महानगरपालिकेनी केली कारवाई

पनवेल/ प्रतिनिधी :
विधानसभेच्या निवडणूका संपताच पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने उपायुक्त जमिर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन दिवस अनधिकृत आठवडा बाजारावर तसेच अनधिकृत स्टाॅलवर धडक कारवाई करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका अतिक्रमण विभागाने आपला निशाणा अनधिकृत मोबाईल टाॅवरवर वळवला आहे. पनवेल , खारघर, कंलबोली, कामोठे या विभागातील 65 अनधिकृत मोबाईल टाॅवर वर धडक कारवाई करत ते सील करण्यात आले.
अतिक्रमण पथकाने रस्त्यावरील अतिक्रमणे, आठवडी बाजार, अनधिकृत जाहिराती यांचेवर कारवाई सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून चारही प्रभागात प्रभाग अधिका-यांनी मोबाईल टाॅवरवर आपला मोर्चा वळविला. आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात धडक कारवाई सुरू करण्यात आली. यात मोबाईल टाॅवर सील करण्यात आले आहेत. अनेकांनी मोबाईल टाॅवर परवानगी प्राप्त न करता उभारले आहेत.
महानगरपालिकेची विहित परवानगी प्राप्त न करता व शुल्क न भरता राजरोसपणे हे टाॅवरवाले आपला व्यवसाय लाखो रूपये भाडे देऊन सुरू ठेवले आहेत. त्यातील खारघर विभाग – 22, कळंबोली विभाग – 20, कामोठे विभाग – 12, पनवेल विभाग – 13 असे एकूण 65  अनधिकृत मोबाईल टाॅवरवर कारवाई करण्यात आली व ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे अशी माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

44 + = 48