1586235382620_news8597
आंतरराष्ट्रीय ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र सामाजिक

कोविड १९ विरोधात दीपक फर्टीलाझयरचे योगदान तळोजातील दीपक प्रकल्प चालू ठेवण्यासाठी सरकारने दिली परवानगी

कोविड १९ विरोधात दीपक फर्टीलाझयरचे योगदान तळोजातील दीपक प्रकल्प चालू ठेवण्यासाठी सरकारने दिली परवानगी

 

पनवेल/प्रतिनिधी :
दीपक फर्टीलाझयर आयसो प्रोपिल अल्कोहोलची (आयपीए) निर्मिती करते, हा अत्यावश्यक पदार्थ असून सॅनिटायझर आणि जंतूनाशकांमध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. सरकारने हा प्रकल्प चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे.
संपूर्ण देशात संचारबंदी असताना दीपक फर्टिलायझरने तळोजा प्रकल्पात कामावर बोलवून कर्मचाऱ्यांचे आयुष्य धोक्यात टाकले आहे, या बातमीच्या संदर्भात ही माहिती दिली जाते आहे. यासंदर्भातील गैर समज दूर करण्यासाठी काही मुद्द्यांवर दीपक फर्टिलायझर व्यवस्थापनाने लक्ष वेधले आहे.
दीपक फर्टीलाझयर आयसो प्रोपिल अल्कोहोलची (आयपीए) निर्मिती करते, हा अत्यावश्यक पदार्थ असून सॅनिटायझर आणि जंतूनाशकांमध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. सरकारने आम्हाला हा प्रकल्प चालू ठेवण्यासाठी परवानगी तर दिली आहेच पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे याचे उत्पादन करून देशाच्या कोविड १९ विरोधातील लढाईमध्ये आम्ही महत्त्वाचे योगदान देतो आहोत कारण आयपीएचे उत्पादन करणारे आम्ही देशातील एकमेव उत्पादक आहोत. आमची सर्व उत्पादने अत्यावश्यक पदार्थांमध्ये येतात आणि त्यासाठी आवश्यक सर्व परवानगी आमच्याकडे आहेत. देशातील खाद्य सुरक्षेची गरज पूर्ण करण्यासाठी आमची खते मदत करत आहेत. आमचे टेक्निकल अमोनियम नायट्रेट (टीएएन) देशातील कोळसा क्षेत्राला मदत करते जे वीज निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
संचारबंदीपूर्वी कारखान्यात १९७८ लोक कामाला होती. संचारबंदीनंतर कारखान्यात केवळ ५३८ म्हणजेच २७ टक्के लोक कामाला येत आहेत. प्रशासन विभागातील बहुतांश लोक घरून काम करत आहेत. कामगारांनी करत असलेल्या बलिदानाची आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि त्याचे आम्ही कौतुक करतो. त्यांचा व्यक्तिगत वेळ देऊन या संकटसमयी ते देशाच्या कल्याणासाठी लढत आहेत. वातावरण अधिक सुरक्षित आणि आरामदायी करून आम्ही त्यांच्या प्रयत्नांना पूरक धोरणे राबवत आहोत. प्रत्येक जण सोशल डिस्टसिंगचा अवलंब करतो आहे, तसेच जेवण आणि वाहतुकीसाठी उत्तम सुविधा देत आहोत. याशिवाय कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत, उदाहर्णार्थ वेळोवेळी कामाच्या ठिकाणाचे निर्जंतुकीकरण करणे, दररोज कामगारांच्या शरीराच्या तपमानाची तपासणी, गेटवर जंतूनाशक स्प्रे उभारणे, एप्रॉन देणे, धूर फवारणी इ. गोष्टी कारखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखी केल्या जात आहेत. आमच्यासाठी कामगार आणि इतरांची तब्येतीची काळजी हे सर्वात मोठे प्राधान्य आहे. तळोज्यासह आमचे सर्व प्रकल्प जागतिक दर्जाच्या सुरक्षा आणि आरोग्य मानकांचे पालन करतात. सोशल मीडियाद्वारे काही असंतुष्ट व्यक्ती चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांविरुद्ध आम्ही आधीच कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. आता ही वेळ देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची असून या उपक्रमांची नोंद घ्यावी तसेच काही प्रश्न, शंका असतील तर media.relations@dfpcl.com या इमेलवर पाठविण्याचे आवाहन या कंपनीकडून करण्यात आले असून यावर तात्काळ निरसन केले जाईल, असे दीपक फर्टीलाझयर व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

57 + = 62