गरीब, गरजूंना पनवेलमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांचा पुढाकार…
पनवेल/प्रतिनिधी :
कोरोना व्हायरस आणि लॉक डाऊन परिस्थिती पाहता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीत पनवेल भाजपतर्फे पक्षातर्फे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. त्या अनुषंगाने मालधक्का झोपडपट्टी, गणेशवाडी लोकमान्य नगर मधील झोपडपट्टी, कुष्ठरुग्ण बांधव, नवनाथ नगर येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजगारापासून दूर रहावे लागत आहे अशा परिस्थितीत ते व त्यांचे कुटूंबिय उपाशी राहू नयेत यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गरीब, गरजूंना तांदूळ, डाळ, मसाला, मीठ, तेल कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंची मदतकार्य सुरु केले. पनवेल भाजपच्यमाध्यमातून हे मदत कार्य पुरविण्यात येत आहे.