Img 20200527 Wa0043
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

लाखो पनवेलकरांची प्रतिकार शक्ती वाढणार… अर्सेनिक अल्बमच्या ३ लाख बाटल्यांचे होणार वाटप

लाखो पनवेलकरांची प्रतिकार शक्ती वाढणार

अर्सेनिक अल्बमच्या ३ लाख बाटल्यांचे होणार वाटप

पनवेल / विशाल सावंत :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील नंदनवन ग्रुप आणि टी क्रिकेट क्लब पनवेलच्यावतीने नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तीन लाख अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांच्या बाटल्या वाटण्याचा निर्णय घेतला आहे. यातील दीड लाख बाटल्या पुढील दोन दिवसात वितरित करायला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांना सहकार्य करणारे डॉ. नितीन पोवळे यांनी दिली .
पनवेल आणि परिसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पनवेलची जनता भयभीत आहे. त्याना मानसिक आणि आर्थिक आधार देण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. केंद्रीय आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम थर्टी ही गोळी कोरोना वायरस होऊ नये, म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे जाहीर केले आहे. या गोळीचा डोस लिमिटेड घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढते असे दिसून आले. ही गोळी घेतल्यानंतर शरीरात कोरोनाशी लढणाऱ्या एंटीबॉडी तयार होतात व कोरोना पासून आपोआप संरक्षण होते. कोरोनाची भिती ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला तसेच प्रतिकारशक्ती कमी असलेल्याना जास्त असते. हीच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम ३० हे औषध काम कांरणार आहे. भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने याला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता सामाजिक संघटनांनी या गोळ्या वाटपाचे काम हाती घेतले आहे. कोरोनावर अद्याप लस मिळाली नसली तरी रोग प्रतिकार शक्तीच्या जोरावर अनेकजण बरे होऊन घरी गेले आहेत. चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूंवर रामबाण औषध किंवा लस तयार झालेली नाही.
त्यामुळे कोरोनाने जगभरात लाखो बळी गेले आहेत. यात ज्येष्ठ नागरिक आणि कमी रोग प्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींचा समावेश जास्त आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना हा एकमेव पर्याय आहे. या पार्शवभूमीवर केंद्राच्या आयुष्य मंत्रालयाने या गोळ्यांची शिफारस केली आहे. अर्सेनिक अल्बम ३० ही गोळी कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांना घेता येत नाही. कोरोना नसलेल्यानाच हा गोळी घेता येणार आहे. या गोळ्यांचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने या गोळ्या लहान मुलांपासून ते वृद्ध, गरोदर महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजार असलेल्या व्यक्ती घेऊ शकतात. पनवेलमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या गोळ्यांची अत्यंत आवश्यकता असल्याचे जाणवले. याचा विचार करून पनवेलमधील डॉ. नितीन पोवळे यांनी सुरुवातीला दररोज हजाराच्या आसपास गोळ्यांचे वाटप सुरु केले. त्यांनी आतापर्यंत २५ ते ३० हजार जणांना या गोळ्या दिल्या आहेत. पनवेल आणि परिसराची लोकसंख्या पाहता मोठ्या प्रमाणात या गोळ्यांची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन पनवेल मधील प्रतिष्ठित नागरिकांनाच नंदनवन ग्रुप आणि टी क्रिकेट क्लब यानाच्या वतीने हे मिशन घेण्याचे ठरले.
पनवेल शहरातील विरुपाक्ष सभागृह येथे गोळ्यांचे पैकींग करण्याचे काम सुरु झाले आहे. डॉ. नितीन पोवळे यांच्यसह नितीन पाटील, संजय पाटकर, राजेश जेठिया, चंद्रशेखर वाडकर, श्रीकांत चवरे, सुभाष पाटील, नंदू पटवर्धन , अप्पू कुंभार, संदीप लोंढे हे या ग्रुपचे सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मेहनत घेऊन दररोज हजारो गोळ्या पॅकिंग करत आहेत. त्यांनी तीन लाख बाटल्या बनवून साधारण १२ लाख जणांना याचा लाभ मिळणार आहे. या गोळ्यांचे वाटप पनवेल आणि परिसरात तसेच रायगडमधील काही तालुक्यात याचे वाटप येत्या काही दिवसात केले जाणार असल्याचे नितीन पाटील यांनी सांगितले .