IMG-20200914-WA0024
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

पत्रकार संजय कदम यांना आदिवासी सम्राट वृत्तपत्र व चॅनेलच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून करण्यात आले सन्मानित

पत्रकार संजय कदम यांना आदिवासी सम्राट वृत्तपत्र व चॅनेलच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून करण्यात आले सन्मानित

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल परिसरातील विविध वृत्तपत्रात वृत्त देण्याचे गेल्या 22 वर्षापासून कार्यरत असलेले पत्रकार संजय कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदिवासी सम्राट वृत्तपत्र व चॅनेलच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
आदिवासी सम्राटचे संपादक गणपत जानू वारगडा, दै.रायगड नगरीचे संपादक राकेश पितळे, आदिवासी सेवा संघाचे सचिव सुनील जानू वारगडा, पत्रकार प्रतिक वेदपाठक आदींच्या उपस्थितीत सन्मानपत्र देवून संजय कदम यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी संपादक गणपत वारगडा यांनी संजय कदम यांनी आत्तापर्यंत वृत्तपत्राच्या माध्यमातून विविध सामाजिक व राजकीय, गुन्हे, शैक्षणिक आदी विषयांवर केलेल्या लिखाणाचे कौतुक करून त्यांनी खर्‍या अर्थाने तळागळातील लोकांना न्याय देण्याचे काम केले असल्याचे सांगितले. या सन्मानपत्राबद्दल संजय कदम यांनी संस्थेचे आभार मानून यापुढे सुद्धा तळागळातील लोकांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्‍वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

55 − 53 =