आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा पुढाकार
अलिबाग/ प्रतिनिधी :
भारत देशाच्या 2021 च्या जनगणनेत आदिवासी धर्मकोड 7 जाहीर करावा याकरिता रायगड जिल्हाचे निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून देण्यात आले आहे. शिवाय अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने महामहिम राष्ट्रपती यांना संपूर्ण देशातून प्रत्येक राज्यातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
आदिवासी हिंदू नसून मनुवादी विचार सरणीच्या लोकांकडून आदिवासींना हिंदू बनविण्याचा प्रयत्न करत आहेत व वनवासी बनवत आहेत. आदिवासी मूलनिवासी आहे या देशाचा खरा मालक आहे, पण या धर्तीचा खरा भूमिपुत्र आहे तरीही मनुवादी विचार सरणी कडून आदिवासींचं अस्तित्व संपविण्याचं कटकारस्थान चालू आहे. हे हाणून पाडण्यासाठी आदिवासी धर्म कोड कॉलम 7 जाहीर करावा अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कोकण प्रदेश अध्यक्ष दत्तात्रेय सुपे, जिल्हाध्यक्ष राम भस्मा, कार्याध्यक्ष कांता पादिर, पनवेल तालुका अध्यक्ष संजय चौधरी उपस्थित होते.
Adivasi Dharmkod coloum pahije