Img 20210719 Wa0020
उरण खारघर ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या मालमत्ता कराविरोधात बेमुदत उपोषण

पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या मालमत्ता कराविरोधात बेमुदत उपोषण

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या जिझिया मालमत्ता कराविरोधात बेमुदत तसेच कळंबोली शहर आणि कळंबोली गावात न झालेल्या विकास कामांसंदर्भात पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक श्री.रविंद्र अनंत भगत बेमुदत उपोषणावर बसले आहे. आमदार मा.श्री बाळाराम पाटील व मा.आदर्श नगराध्यक्ष मा.श्री जे.एम.म्हात्रे यांच्या समवेत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी उपोषण स्थळी जाऊन नगरसेवक श्री.रविंद्र भगत यांची भेट घेऊन पाठींबा दिला. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस श्री.गणेश कडू, काँग्रेस नेते श्री.सुदाम पाटील, समाजवादी पक्षाचे श्री.अनिल नाईक, नगरसेवक श्री.शंकर म्हात्रे, श्री.गोपाळ भगत, श्री.सतीश पाटील, श्री.विजय खानावकर, शिवसेना नेते श्री.कृष्णा कदम, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, सौ.प्रज्योती म्हात्रे, सौ.सारिका भगत, सौ.प्रिया भोईर, युवा नेते श्री.प्रकाश म्हात्रे, श्री.जॉनी जॉर्ज, श्री.किरण दाभने, श्री.विजय भोईर, श्री.विजय पाटील, श्री.सुभाष पाटील, महिला आघाडीच्या सौ.सरस्वती काथारा, सौ.स्वाती रौधंळ तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होते.


पनवेल महानगरपालिका सिडको क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे विकासकाम न-करता नागरिकांवर जिझिया मालमत्ता कर सत्ताधाऱ्यांच्या मदतीने लादलेले आहे. या विरोधात शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीच्या माध्यमातून रहिवासीयांच्या बाजूने वारंवार आंदोलन करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + 3 =