Img 20210725 Wa0029
ताज्या पोलादपूर महाड रायगड सामाजिक

पूरग्रस्तांच्या मदतीला स्वयंसेवी संस्थाचा पुढाकार, ग्राम संवर्धनची टीम पोहोचली दरडग्रस्त कोंडीवते गावात

पूरग्रस्तांच्या मदतीला स्वयंसेवी संस्थाचा पुढाकार,
ग्राम संवर्धनची टीम पोहोचली दरडग्रस्त कोंडीवते गावात


पनवेल/ प्रतिनिधी :
अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे कोकणातील चिपळूण व महाड या तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या महापुराने फार मोठे नुकसान केले असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले आहे, तेथील परिस्थिती पुर्वपदावर येण्यासाठी अजून काही दिवस जातील अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि जिल्हा परिषद रायगड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोकण कट्टा विलेपार्ले, राष्ट्र सेवा दल रायगड आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, बांधनवाडी, पनवेल यांच्या वतीने पुराचे पाणी ओसरताच सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरग्रस्तांच्या तात्काळ मदतीसाठी शनिवार (दि.२४ जुलै) रोजी उदय गावंड, रणजित पाटील, प्रशांत पाटील, सचिन पाटील, राजेश रसाळ, राजू पाटील, तेजस चव्हाण, अल्लाउद्दीन शेख, आणि सलमान शेख ह्या कार्यकर्त्यांची टीम रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक जयवंत गायकवाड, सुरेश पाटील, महाड पंचायत समितीतील किशोर चांदोरकर, विस्तार अधिकारी पं स. महाड, अरुण दौंड, ग्रामसेवक नाते कोंडीवते ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक चिले महाड शहरातून सर्वत्र रस्ते खचलेले असताना घटनास्थळी पोहचली. व सोबत नेलेले ५०० किलो तांदूळ, १०० किलो डाळ, ५० किलो गोडेतेल, ५५० पार्ले बिस्किटचे पेकेट्स, मीठ, टूथ पेस्ट, साबण यासारख्या वस्तूंची मदत महाड तालुक्यातील दरडग्रस्त कोंडीवते गावात जाऊन वाटप केले मात्र एकूणच परिस्थिती बघता खूप मोठ्या प्रमाणावर महाड शहर आणि आजूबाजूचा परिसरात नुकसान झाले आहे.

वाहने, घरे वाहून गेली आहेत. झोपडपट्टीतील लोकं आणि गुरे यांची बिकट अवस्था असून दुकानांपासून ते गोदामाणपर्यंत सर्वच्या सर्व पुराच्या भक्ष्यस्थानी गेले असून सर्वत्र गाळ पसरला असून बाजार पेठेत दुर्गंधी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सद्या होणारी मदत ही पुरेशी नसून संस्थेच्या वतीने अजूनही शेकडो कुटुंबांना खाद्यपदार्थ, अन्नधान्य, पिण्याचे पाणी, यासारखी मदत गोळा करून पाठविणार आहोत तरी या कार्यात मदत दात्यानी पुढे येवून पुरग्रस्त बाधंवासाठी मदत करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर केले आहे.