- संगणक परिचालकांना मानधन नको, वेतन द्या! यासारखे अनेक मागण्यासह पेठ पंचायत समितीला दिले निवेदन.
- पेठ तालुक्यातील संगणक परिचालक १९ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर!
नाशिक/शैलेश राऊत :
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संग्राम व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती मधील संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करत आहे.
हे काम करत असताना राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला दाखले, प्रधानमंत्री किसान योजना, श्रम योगी योजना, जन आरोग्य योजना, पीक विमा योजना, शौचालय उपलोडिंग, प्रधानमंञी आवास योजना, अस्मिता योजना या व्यतिरीक्त महाऑनलाईनचे कामे ग्रामसभा, मासिक सभा, गाव विकास आराखडे यासह ग्रामपंचायत सांगेल ते काम संगणक परिचालक करतो. तरी सुद्धा याच संगणक परीचालकला मानधन मिळत नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन सुद्धा प्रत्येक महिन्याचे मानधन ठरवलेल्या तारखेला मिळत नाही. त्यामुळे 19 ऑगस्टपासून पेठ पंचायत समितीत बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. याकरिता नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने पंचायत समिती पेठ येथील विस्तार अधिकारी श्री. श्री. सादवे व श्री. खैरनार (OS) यांना निवेदन दिले. शिवाय या आंदोलनात खालील प्रमाणे प्रमुख मागण्या असणार आहेत.
राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकाला आय. टी महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देणे, पंचायत समिती व जि.प स्तरावरील संगणक परीचालकाला नियुक्ती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्याचा शासन निर्णय काढून त्यांना महाराष्ट्र आय.टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी, सर्व संगणक परिचालक यांचे मानधन १४ वित्त आयोगातुन न देता राज्य शासनाच्या निधीतून प्रती महिना किमान वेतन १५००० रूपये देण्यात यावे अशाप्रकारचे मागण्या असून जो पर्यंत वरील मागण्या शासन मान्य करीत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी पेठ तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश महाले, सचिव मंगेश गवळी, व केंद्रचालक शैलेश राऊत, सीताराम कामडी, शांताराम गायकवाड, किरण ढेंगळे उपस्थित होते.