Img 20230728 Wa0154
ताज्या पनवेल सामाजिक

माडभुवन वाडीचे तातडीने केले स्थलांतर..

Adivasi samrat logo new website

माडभुवन वाडीचे तातडीने केले स्थलांतर..

पनवेल/ आदिवासी सम्राट :
पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीत सारसई माडभुवन ही आदिवासी वाडी गेली कित्येक वर्षे डोंगराच्या पायथ्याशी वास्तव्य करीत आहे, गेल्या वर्षापासून या वाडी लगत असलेल्या डोंगराला आपोआप तडे जात आहेत. ही बाब येथील ग्रामस्थांनी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत आणि आमदार महेश बालदी यांच्या निदर्शनास आणून दिली.

adivasi logo new 21 ok (1)

यावेळी आमदार यांनी तत्काळ दखल घेऊन प्रशासनाला सूचना केल्या आणि ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे सूचित केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तहसीलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी संजय भोये, जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत, वन विभागाचे अधिकारी काटकर यांनी संयुक्त रित्या वाडीला भेट दिली आणि प्रतेक्ष डोंगरावर चढून नैसर्गिक पडलेल्या भेगांची पाहणी केली, यावेळी उपस्थित तहसीलदार यांनी येत्या दोन दिवसात ग्रामस्थांना स्थलांतरित करण्याचे आदेश प्रशासनाला  दिले होते. जवळच असलेल्या कर्नाळा गार्मेंट चे रिकाम्या इमारतींमध्ये सुव्यवस्था करून आज येथील सर्व कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले यावेळी रा. जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत तहसीलदार विजय पाटील नायब तहसीलदार संभाजी शेलार मंडळ अधिकारी तुषार काकडे, तलाठी एस. टी . तवर, सरपंच नाजनीन पटेल सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत, विजय मिरकुटे, ग्रामसेविका वैशाली जाधव ग्रा. प.सदस्य  आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ  उपस्थित होते. 

  IMG-20230728-WA0154