IMG-20221213-WA0109
अलिबाग ताज्या नवीन पनवेल रायगड सामाजिक

राष्ट्रवादीचे पनवेलमध्ये मोफत आरोग्य शिबिर संपन्न

राष्ट्रवादीचे पनवेलमध्ये मोफत आरोग्य शिबिर संपन्न

नवीन पनवेल / प्रतिनिधी :
 राष्टवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागातर्फे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  एस.जी.डी पब्लिक स्कूल, प्लॉट नं.२८,सेक्टर-१०,खांदा कॉलनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत आरोग्य संपन्न झाले. 
IMG-20221213-WA0109सदर आरोग्य तपासणी शिबीराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डि.वाय.पाटील हॉस्पिटलच्या चमूने  मोफत डोळे  तपासणी केली. डोळे तपासुन चश्म्याचे नंबर काढुन देण्यात आले. अल्पदरात चष्मा देण्यात आले. २ शिबिरार्थीना मोतीर्बिंदू शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विना औषधी अँक्युप्रेशर चिकित्सेद्वारे आयुष हिलिंग सेंटर, नवीन पनवेल मधील उमेश शर्मा यांनी विविध आजारावर अँक्युप्रेशर उपचार केले. आई हॉस्पिटलचे बालरोग तज्ञ डॉ. विकास गंडाळ यांनी लहान मुलांवर उपचार केले. व स्त्रीरोग तज्ञ डॉ.अश्विनी गंडाल यांनी महिलांची तपासणी करुन समुपदेशन केले.  किशोर देवधेकर (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर जिल्हा), डॉ.अमित शिनगारे (पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष) डॉ. जयदेव काळभोर (अध्यक्ष खांदा कॉलनी राष्ट्रवादी डॉक्टर सेल), महेशकुमार राऊत (राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग ५ अध्यक्ष) आदी प्रमुख पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

adivasi logo new 21 ok (1)