20221221_195149
अलिबाग कोकण ठाणे ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी…. | गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये

पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी 

गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये

पनवेल/ प्रतिनिधी :
गेस्ट हाऊस बांधण्याकरता सव्वा लाख रुपये मागून त्यापैकी एक लाख आठ हजार रुपये स्वीकारल्या प्रकरणी सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तिघांवर  पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20221221_195240भाजपच्या खानाव ग्रामपंचायत सरपंच जयश्री दिसले यांचे पती शशिकांत दिसले, बाबू उर्फ सचिन दिसले व दीपक तवले यांनी रंजना अहिरे यांच्याकडे गेस्ट हाउस सुरू करण्याकरता सव्वा लाख रुपये मागितले. त्यातील 1 लाख 8 हजार स्वीकारून यापुढेही एक लाख रुपये महिना द्यावा लागेल नाहीतर जेसीबीने सर्व उडवून टाकेल अशी धमकी अहिरे याना देण्यात आली. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच तिघांनाही अटक करण्यात आली.

adivasi logo new 21 ok (1)