20230827_073604
कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

पनवेलमध्ये दिव्यांगांच्या दारी अभियान… दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू त्याचबरोबर पालकमंत्री, मंत्री, खासदार,आमदार यांची उपस्थिती

Adivasi samrat logo new website

पनवेलमध्ये दिव्यांगांच्या दारी अभियान…
दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू त्याचबरोबर पालकमंत्री, मंत्री, खासदार,आमदार यांची उपस्थिती

पनवेल/ आदिवासी सम्राट – जिल्हाधिकारी रायगड, रायगड जिल्हा परिषद व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय दिव्यांग कल्याण विभागातर्फे दिव्यांगांच्या दारी अभियानाचे पनवेलमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

20230827_073502दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता पनवेलमधील विरूपाक्ष मंगल कार्यालय येथे या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे शासनाचे धोरण आहे.जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी, शासकीय यंत्रणा उपस्थित राहून दिव्यांगांच्या समस्यांचे निराकरण या अभियानातून होणार आहे. या कार्यक्रमासाठी दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, रायगडचे खासदार सुनिल तटकरे, आमदार जयंत पाटील, आ.निरंजन डावखरे, आ. अनिकेत तटकरे,आ.भरत गोगावले, आ.प्रशांत ठाकूर, आ.रविंद्र पाटील, आ.महेंद्र थोरवे, आ.महेश बालदी, आ. महेंद्र दळवी तसेच कोकण विभागाचे आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर उपस्थित राहणार आहेत.

adivasi logo new 21 ok (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 4 = 1