20230827_075657
ताज्या पनवेल सामाजिक

आठवडे बाजारातून पैसे, झुमके, मोबाईलची चोरी

Adivasi samrat logo new website

आठवडे बाजारातून पैसे, झुमके, मोबाईलची चोरी

पनवेल/ आदिवासी सम्राट :
अनधिकृतपणे भरत असलेल्या आठवडे बाजारातून साडेतीन ग्राम वजनाचे कानातील सोन्याचे झुमके, साडे 12 हजार रुपये आणि एक मोबाईल चोरीला गेल्याचा प्रकार विचुंब येथे घडला आहे याप्रकरणी खानदेश शहर पोलीस ठाण्यात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    adivasi logo new 21 ok (1)

17 ऑगस्ट रोजी विचुंबे येथील पोलीस चौकी जवळील मोकळ्या मैदानात अनधिकृत भरत असलेल्या आठवडी बाजारात ज्योती अहिरे या भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या यावेळी त्यांच्या पर्स चोरट्याने चोरून नेली या पर्समध्ये साडेतीन ग्राम वजनाचे सोन्याचे झुमके साडेचार हजार रुपये चोरट्याने चोरून नेले तसेच लक्ष्मी राम रतन गुप्ता यादेखील आठवडे बाजारात भाजी घेण्यासाठी गेले असता त्यांची पर्स मधील आठ हजार रुपये आणि एक अप कंपनीचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला अनधिकृतपणे भरत असलेल्या या आठवणी बाजारात चोरीचे प्रमाण वाढू लागले आहे त्यामुळे खांदेश्वर पोलिसांनी हे आठवडी बाजार बंद करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + 5 =