पहल संस्थेने मुला- मुलींसाठी हाती घेतले विविध उपक्रम..
मुलींसाठी नर्सिंग ; तर मुली, मुलांसाठी मोबाईल रिपिरिंग कोर्सेस
खालापूर / आदिवासी सम्राट :
पहल संस्थेच्या वतीने काही वर्षांपासून मुला मुलींना विविध प्रशिक्षण घेवून अनेक मुलांना नोकरीला लावले. तर काही मुलांनी स्वतः च व्यवसाय चालू केले आहे. त्यातच पहल संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षणामध्ये विशेषतः आदिवासी मुला, मुलींची अधिक संख्या असते. त्यामुळे आदिवासी मुलं, मुलींना भविष्यात रोजगाराचं साधन उपलब्ध होत जातील.
शुक्रवार, दि. ०८/०९/२०२३ रोजी पहल संस्थेच्यावतीने सकाळी ११.०० वाजता नर्सिंग मुलींची क्लासच्या मुलीच्या पालकांची मीटिंग घेण्यात आली. यात एकूण २१ मुली व २८ पालक उपस्थित राहून यांच्या पाल्याची-नात्या विषयी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर प्रत्येक मुलींनी आपल्या पालकांना ग्रिटींग कार्ड देत पालकांनी देखील मुलींनी चॉकलेट च्या रूपाने भेट वस्तू दिली.
दुपार नंतर पहल संस्थेच्या वतीने मुला-मुलींसाठी मोबाईल क्लास चा कार्यक्रम हाती घेण्यात आले. माणसाच्या मुलभुत गरजापैकी मोबाईल ही एक गरज भासत असल्याचे उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी सांगितले, त्यामुळे मोबाईल रिपिरींग कोर्स कसा तुम्हाला यशस्वीरित्या पार पाडता येईल. यासाठी कोर्सला असणा-या मुला, मुलींना मार्गदर्शन केले.
यावेळी खालापूर पंचायत समिती शिक्षण विभागातील श्री. म्हाञे, बिरसा ब्रिगेडचे रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंत शिद, आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा, आदिवासी सेवा संघाचे खालापूर तालुका अध्यक्ष विष्णू खैर, पहल संस्थेचे स्टाफ वैशाली मॅडम, अनुराधा, नैना, प्रज्ञा, अलिषाबा प्रज्ञा पाठारे, तसेच संजय सर, रामदास, संदीप, प्रवीण, भावेश, कौस्तुभ तसेच क्लास आलेले मुलं, मुली उपस्थित होते.