20240429_111630
अलिबाग कोकण ताज्या पनवेल सामाजिक

मालडूंगे ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई

Adivasi samrat logo new website

मालडूंगे ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई

काही गावांमध्ये पुरविले जातात पाण्याचे टॅंकर ; तर काही गावांना जाणीव पूर्वक ठेवले पाण्यापासून वंचित..!

ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार ; बीडीओंने नियंत्रण ठेवण्याची गरज

पनवेल/ प्रतिनिधी :
मालडूंगे ग्रामपंचायत ही पनवेल तालुक्यातील शेवटच्या टोकावर आणि डोंगराळ भागात आहे. या ग्रामपंचायत हद्दीत पनवेल महानगरपालिकेचे देहरंग धरण सुध्दा आहे, या धरणातील पाण्याचा वापर संपूर्ण पनवेल शहरात केला जातो.

20240429_111551

माञ, धरण जवळ असतांनाही येथे अनेक आदिवासी वाड्या – गावांमध्ये उन्हाळी पाणी टंचाई भासत असते. त्यामुळे दरवर्षी सदस्य व ग्रामस्थांच्या मागणीवरून ग्रामपंचायत पाणी टंचाईग्रस्त आराखडा तयार करून पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केला जात असतो. परंतु, पाणी टंचाईग्रस्त आराखडा पंचायत समिती मंजूर करत नाही तो पर्यंत ग्रामपंचायत ही पाणी टंचाई वाड्या, पाड्यांना टॅंकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जातो.
20240429_111521यावर्षी मालडूंगे ग्रामपंचायतीने ठराविकच पाणी टंचाईग्रस्त वाड्या -पाड्यांना टॅंकरच्या साहाय्याने पुरवठा केला, माञ काही ग्रामस्थांचा आणि ग्रामपंचायत सदस्यांचा रागरोष धरून ग्रामपंचायतीच्या जबाबदारी व्यक्ती आणि ग्रामसेवक यांनी पाणी टंचाई ग्रस्त गावाला जाणीव पूर्वक पाण्याचा टॅंकरचा पुरवठा केल्याचे दिसत नाही. शिवाय, अनेकदा ग्रामसेवकांना कळविण्यात आले असता बघून घेऊ? करण्यात येईल? असे सांगून महिनाउलटला तरी ग्रामपंचायत जाणीवपूर्वक करत आहे कानडोळा. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला पनवेल गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीवर नियंत्रण आणण्याची काळाची गरज आहे.

adivasi logo new 21 ok (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

31 − 29 =