‘लाडक्या बहिणींचे लाडके प्रशांतदादा’ ;
लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल माता-बहिणीकडून जोरदार स्वागत
पनवेल/ आदिवासी सम्राट :
राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून विविध जनकल्याणकारी योजना राज्यातील नागरिकांसाठी राबविण्यात आल्या. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पनवेलमध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न कामी आले. या योजने अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र व पनवेल तालुक्यात १ लाखहून अधिक महिलांना त्याचा लाभ मिळाला. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अर्थात आमदार प्रशांत ठाकूर’ यांना आशिर्वाद देण्यासाठी लाडक्या माता-बहिणी सरसावल्या असल्याचे चित्र पहायला मिळत आहेत.
१८८ पनवेल विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांकडून सरकारच्या या योजनेचे जोरदार स्वागत झाले. आणि त्याच पद्धतीने या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाली. आज राज्यातील करोडो महिलांना या योजनेचा थेट फायदा झाला. हि योजना अशीच पुढे चालू राहिली पाहिजे यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पनवेल विधानसभा मतदार संघातून भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी महिला सज्ज झाल्याचे प्रचार रॅलीत अधोरेखित होते. विचुंबे व पळस्पे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आंबिवली, वांगणी, लोणीवलीवाडी, लोणीवली, पाली, मोहाचा पाडा, मोहो, चिखले, शिवकर, उसर्ली खुर्द, देवद या गावांमध्ये झालेल्या प्रचारार्थ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी प्रत्येक गावात जागोजागी माता- भगिनींनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे औक्षण करून स्वागत केले. आणि ”पुन्हा विजयी भव’ असा आशीर्वाद देतानाच लाडकी बहीण योजना पनवेलमध्ये यशस्वीपणे राबविल्याबद्दल धन्यवाद दिले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी माता बहिणी, ज्येष्ठांचा आशीर्वाद विधायक कार्य करण्यासाठी ताकद देत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांना नमस्कार करून त्यांचेही आशीर्वाद घेतले. यावेळी युवकांनी जोरदार घोषणा देत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा जयघोष केला.
या रॅलीला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते वामनशेठ वाघमारे, चाहुशेठ म्हात्रे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा कमला देशेकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, देवद ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद वाघमारे, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, माजी सरपंच किशोर सुरते, माजी सरपंच बळीराम पाटील, माजी सरपंच अमिता म्हात्रे, मुकेश भगत, मछिंद्र पाटील, विश्वजीत पाटील, अविनाश गायकवाड, कामगारनेते रवींद्र नाईक, सतीश मालुसरे, संदीप वाघमारे, निलेश वाघमारे, प्रवीण पालव, संतोष शेळके, पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, समिना साठी, प्रतिभा भोईर, शिल्पा म्हात्रे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.