Img 20241110 Wa0045
पनवेल

समस्त गुजराती लोहाना समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा भाजपमध्ये

समस्त गुजराती लोहाना समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा भाजपमध्ये

पनवेल/ आदिवासी सम्राट :
लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन समस्त गुजराती लोहाना समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले.

Img 20241110 Wa0045
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, गोवा राज्याचे आमदार दयानंद सोपटे, भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस व पनवेल विधानसभा प्रमुख नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमोल, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, तालुका उपाध्यक्ष एस. के. नाईक, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, ज्येष्ठ नेते सी.सी.भगत, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, अमरीश मोकल, युवा नेते प्रतीक सादरानी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. निल पुजारा यांच्याकडे युवकांची फळी आहे, त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मताधिक्यात भर पडणार आहे.