Img 20191027 Wa0038
कोकण ठाणे ठाणे ताज्या नवी मुंबई नाशिक पनवेल महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड सामाजिक

आदिवासी सम्राट हे वृत्तपत्र लोकप्रिय होत आहे- मा. खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर

आदिवासी सम्राट हे वृत्तपत्र लोकप्रिय होत आहे- मा. खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर

साप्ताहिक आदिवासी सम्राट दिपावली विशेषांक प्रकाशन

पनवेल/ प्रतिनिधी :
समाज चळवळीचे असणारे एकमेव वृत्तपत्र आदिवासी सम्राट या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेल येथील निवासस्थानी (दि.27 ऑक्टो.) रोजी प्रकाशन करण्यात आले.
गणपत वारगडा यांचा आदिवासी सम्राट या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजातील अनेक अडचणी, प्रश्न मांडले जातात आणि ते प्रशासनापर्यंत पोहोचवले जाते. शिवाय आदिवासी समाजात वृत्तपत्राच्या माध्यमातून जनजागृती व प्रबोधन देखील करत असतात. त्यामुळे आदिवासी सम्राट हे वृत्तपत्र दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे, असे माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांनी दिवाळी अंकाचे प्रकाशन करतावेळी सांगितले. तसेच गणपत वारगडा यांचा मोठा संपर्क असल्याने त्याचा फायदा समाजाला होत असतो असे ही सांगितले.
यावेळी रायगडजिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू, दैनिक रायगड नगरीचे कार्यकारी संपादक राकेश पितळे, कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर, आदिवासी सम्राटचे संपादक गणपत वारगडा, लोकमतचे पञकार मयुर तांबडे, पञकार विजय पवार, सुनिल वारगडा, धनश्री सत्ता, बाळकृष्ण कासार आदी. पञकार उपस्थित होते.