खेडच्या आदिवासी भागातील तरूण दत्ता तिटकारे झाला अभिनेता…
या आदिवासी अभिनेत्याचा 13 चिञपट; तर लक्ष्य, माझे सौभाग्य, क्राईम पेटोल, सावधान इंडिया सह 7 ते 8 मराठी व हिंदी मालिकेत केले काम..
इतर आदिवासी तरूणांसाठीही शॉर्ट फिल्मचा ही सहभाग.
आदिवासी समाजाच्या संवेदना पोहाचविण्याचा प्रयत्न….
आदिवासी समाजाच्या जाणिवा, संवेदना आणि संस्कृती लोकांपर्यत पोहोचावी यासाठी रक्षिता या शॉर्ट फिल्मचे शूटिंग करत आहे. अमोल टोंगरे दिग्दर्शित चित्रपटात दत्ताबरोबर आदिवासी भागातील वैतनी भोसले, कोमल आसवले, विजया पिचड, दीपक जरड, रवी तेलधुन, भरत घावटे, विशाल पठारे हे तरूण काम करत असून, ती एक आदिवासींची संघर्ष कथा असणार आहे.
———————————–
खेड/ प्रतिनिधी :
खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी दुर्गम भागातील दत्ता तिटकारे हा शिक्षण घेत असताना चित्रपट पाहता पाहता अभिनेत्यांच्या अदाकरीने भारावून जात असे. अखेर हा ध्येय खेडाचा अभिनेता झाला. आई – वडीलांसह मित्रांनी प्रेरणा दिली असं दत्ता तिटकारे यांनी सांगितले.
वडील नोकरी करीता असल्याने शालेय शिक्षण घेत असताना कधीच आर्थिक अडचण भासली नाही. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण घेत असताना खेळकर मन अभ्यासात ब-यापैकी रमायचे. मात्र, त्या काळातील चित्रपट पाहिले. की भरपूर लोकप्रियता मिळविलेले कलाकार होते. सर्वत्र अभिनेते, अभिनेत्री किती सुंदर अभिनय करतात. किती लोकामध्ये त्यांचीच चर्चा असते. हे दत्ता आपल्या मित्रांसमवेत बोलत असे. तेथून त्याच्या मनात अभिनय क्षेत्रात पाउल टाकण्याची स्वप्ने पडू लागली. आपणही अभिनेता झालो, तर आपल्यालाही अशी लोकप्रियता मिळेल. आपलेही असंख्य चाहते बनतील. अशी मनोमन स्वप्ने पाहण्यास सुरूवात झाली.
मात्र, शालेय जीवनात कधी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला नाही. तसे धाडसही झाले नाही. शाळा सोडली अन् तेथूनच अभिनव करायला चालना मिळाली. नायफड परिसरातील अनेक कलाकारांनी एकत्र येउन भारूड तयार केले. नाटक : गाढवाचं लग्न या नाटयप्रयोगातून लोकल थिएटरमध्ये 15 वर्षे अभिनय केला. गावोगावी फिरून या कलाकरांनी लोकांची मने जिंकली, त्यात दत्ता तिटकारे याने विविध पात्रे साकारून अभिनयाचा ठसा उमटविला.
पुणे येथील अभिनयाच्या इन्स्टिटयूमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. तेथूनच पुढे टी.व्ही. सीरियलमधील लक्ष्य मालिकेसह अन्य सीरियलमध्ये काम सुरू केले. अखेर बाईकर्स अड्डा हा पहिला चित्रपट मिळाला. अनेक नामवंत कलाकरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. सर्वच कलाकारांचे चांगले सहकार्य मिळाले. अभिनयाचे प्रशिक्षण घेत असताना काही सीरियल व चित्रपट मिळाले. बाईकर्स अड्डा रिलिज झाला. अन्य आगामी चित्रपटात ही काम करत असल्याची दत्ता तिटकारेंनी सांगितले.
website designers in mumbai